Sunday, January 12, 2025
Home बॉलीवूड दीपिका जिममध्ये कसा गाळते घाम? कॅटरिना कॅफने व्हिडिओ शेअर करत केला खुलासा

दीपिका जिममध्ये कसा गाळते घाम? कॅटरिना कॅफने व्हिडिओ शेअर करत केला खुलासा

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि कॅटरिना कैफ या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. दीपिकाचा फिटनेस पाहून सर्वांनाच समजते की, अभिनेत्री जीममध्ये खूप घाम गाळते, पण कॅटरिनाने बनवलेल्या एका व्हिडिओने तिचे रहस्य उघड केले आहे. दीपिकाने स्वतः कॅटरिनाने बनवलेला व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा मजेदार व्हिडिओ पाहिल्यानंतर सेलिब्रिटींनाही हसू अणावर झाले आहे, तर अनेक चाहते या दोन्ही सुंदर अभिनेत्रींना चित्रपटात एकत्र पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

अभिनेत्री दीपिका पदुकोण (deepika padukone) हिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हिडिओमध्ये कुणी तरी निळ्या कापडाचा झूला बनवून जिममध्ये आराम करताना दिसत आहे. ती दुसरी कोणी नसून दीपिका स्वतः आहे आणि जिमच्या आत दीपिकाची ही कृती कॅटरिना कैफ (katrina kaif) हिने तिच्या कॅमेऱ्यात शांतपणे कैद केली आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये कॅटरिना किंवा दीपिका दोघेही दिसत नाही आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

हा मजेदार व्हिडिओ शेअर करत दीपिका पदुकोणने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी जिममध्ये खूप मेहनत घेत आहे.” मात्र,  माझ्यासोबत कॅटरिना कैफ चांगले नाही करत आहे. यासोबतच कॅमेऱ्याचे इमोजीही शेअर केले आहेत. ज्यावरून कॅटरिना व्हिडिओ घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
या मजेशीर व्हिडिओवर चाहतेही भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत इशान खट्टरने लिहिले की, “द ममी रिटर्न्स.” तर कॅटरिनाने या व्हिडिओवर कमेंट करत म्हटले की, “आम्हाला दोन झुले पाहिजेत.”

अभिनेत्रींचे चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
कॅटरिना कैफ ‘फोन भूत’ या चित्रपटात इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे, तर दीपिका पदुकोण शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. ‘पठाण’ पुढील वर्षी 25 जानेवारीला रिलीज होणार आहे तर ‘फोन भूत’ नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अर्रर्र! सलमान खान शोमध्ये परतताच उडाली खळबळ, सुंबुल तौकीरवर चागंलाच संतापला अभिनेता

सिद्धार्थने रोमँटिक पद्धतीने अदितीला दिल्या शुभेच्छा, चाहत्यांना आठवले मंगलाष्टक

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा