बाॅलिवूड अभिनेता सलमान खान ‘बिग बॉस 16‘ आपल्या खास शैलीत होस्ट करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. मात्र, अलीकडेच सलमानला डेंग्यू झाल्यामुळे काही दिवस करण जाेहर याने शो हाेस्ट केला होता. पण आता सलमान बिग बॉसचा होस्ट म्हणून परतला नाही तर मनमानी करणाऱ्या स्पर्धकांनाही त्याने फटकारायला सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस 16’ च्या ‘वीकेंड का वार’ या एपिसोडमध्ये सलमान खान ‘इमली‘ सीरियल फेम अभिनेत्री सुंबूल तौकीर हिला फटकारताना दिसणार आहे. सलमानने शोमध्ये न दिसण्याबाबत बोलून दाखवत तिला ‘टॅग अलाँग’ म्हटले आहे. बिग बॉसचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गेल्या आठवड्यात सुंबुलचा खेळ पाहून सलमान रागावला आहे.
सलमान (salman khan) म्हणाला, “सुंबल तू आजच्या तारखेत एक उदाहरण बनून राहिली आहेस. तु कुणाला तरी फॉलो करत राहते, रडत राहते, सतत तक्रार करत राहते.” होस्ट सलमान इथेच थांबला नाही तर पुढे म्हणाला, ”तु घरात काय केले? तू ‘मी खूप बलवान आहे’ अशा मोठमोठ्या गोष्टी केल्या पण तू घरात दिसत नाहीस.” आता नॅशनल टीव्हीवर सलमानच्या या फटकारेला सुंबुल कसा प्रतिसाद देते आणि शोमध्ये ती काय नवीन करते, हे लवकरच कळेल. याआधी सुंबुल (sumbul touqeer) ‘इमली’ शोमध्ये मुख्य भूमिकेत दिसली हाेती. तिची ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच गाजली हाेती.
सलमान करणार कॅटरिना साेबत ‘टिप टिप बरसा’वर डान्स
दुसरीकडे, बिग बॉसच्या वीकेंड एपिसोडबद्दल बाेलायचे झाले, तर यावेळी ‘फोन भूत’ चित्रपटातील कलाकार देखील सलमान खानच्या शोच्या सेटवर सहभागी होणार आहेत. विकी कौशलसोबत लग्नानंतर कॅटरिना कॅफ पहिल्यांदाच सलमानला भेटणार आहे. त्यांची ही भेट खूपच मजेशीर असणार आहे. शोमध्ये सलमान कॅटरिनासोबत ‘टिप टिप बरसा पानी’वर डान्स करतानाही दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
पांढऱ्या साडीमध्ये हिनाचे फुलले सौंदर्य! पाहिलात का अभिनेत्रीचे नवीन फोटो?
अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीमध्ये का झाली मारामारी? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल