Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड करण सिंग ग्रोव्हरसोबत बिपाशाने दाखवल्या डान्स मूव्ह, पाहा भन्नाट व्हिडिओ

करण सिंग ग्रोव्हरसोबत बिपाशाने दाखवल्या डान्स मूव्ह, पाहा भन्नाट व्हिडिओ

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट आणि प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर यांच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे. आता बॉलिवूडची ग्लॅमरस गर्ल बिपाशा बसू देखील बाळाच्या आगमनाची वाट पाहत आहे. बिपाशा येणाऱ्या पाहुण्यालाबद्दल खूप उत्साहित आहे आणि बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. अलीकडेच तिने तिचा पती करण सिंग ग्रोवरसोबतचा एक डान्सिंग व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूप आनंदी दिसत आहे.

अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) अनेकदा तिच्या प्रेग्नेंसीशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ साेशल मीडियावर चाहत्यांसाेबत शेअर करत असते. तिच्या डिलिव्हरीची तारीख जवळ आली आहे आणि लवकरच त्यांच्या घरीही बाळाचे आगमन हाेणार आहे. बिपाशाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती मस्ती करताना आणि नाचताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला हलता येत नाही.#पॅरेंट्सटूबी #मम्माटूबी #लवयॉरसेल्फ.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

बिपाशाने स्वतःचा आणि करणचा हा क्यूट व्हिडिओ शेअर करताच साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, चाहते तिच्या या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सच्या माध्यामातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तिचे मित्र आणि चाहते व्हिडिओवर हार्ट इमोजी पाठवत आहेत. तिच्या एका मित्राने कमेंट करत लिहिले की, “आणखी काही दिवस बाकी आहेत.” त्याचवेळी एका मित्राने लिहिले, “आता बेबी माकडला भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

काही दिवसांपूर्वी बिपाशाने तिच्या प्रेग्नेंसी शूटचा फोटो शेअर केला होता, ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती. (bipasha basu dances with husband karan sing grover waiting for little monkey)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जीवलगा! समंथाच्या आजाराची माहिती मिळताच नागा चैतन्यने केला फोन; म्हणाला, ‘काही मदत…’

शाेयबसाेबत लग्न बंधनात अडकण्यापूर्वी सानियाचा माेडला हाेता साखरपुडा, वाचा सविस्तर

हे देखील वाचा