Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘अभिनेत्रींना अभिनेत्यांपेक्षा कमी लेखलं जातं;’ म्हणत, बॉलिवूड इंडस्ट्रीतील भेदभावावर स्पष्टच बोलली रवीना टंडन

प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन हिने 80-90च्या दशकामध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर राज्या गाजवले होते. आजही अभिनेत्री आपल्या दमदार अभिनयासायी ओळखली जाते तिने नुकतंच केजी ‘एफ चॅप्टर2‘ मध्ये ‘रमिका सेन’ पंतप्रधान म्हणून भूमिका निभावली होती. तिच्या भमिकेचे अनेकांनी कैतुक केले होते. मात्र, यावेळेस रविना आपल्या अभिनयामुळे नाही, तर दमदार वक्तव्यामुळे खूपच चर्चेत आली आहे.

बॉलिवूडमध्ये 80-90 च्या दशकामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) ही आपल्या अभिनयासोबतच सडेतोड वक्तव्यासाठी देखिल ओळखली जाते. तिने अनेकदा समाताजील काही मुद्दे घेऊन बिंदास्तपमे आपले मत व्यक्त करतअसते.  अभिनेत्रीने नुकतंच एक मोठा प्रश्न मीडियासोमर मांडला आहे. रविनाच्या मते, “मीडिया बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्रींमध्ये भेदभाव करत आहेत, त्यांना अभिनेत्यांपेक्षा कमी लेखलं जातं आणि अभिनेते नेहमी सपरस्टारडमचा आनंद लुटत असता.”

माध्यमातील वृत्तानुसार रवीना टंडन हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला बॉलिवूडविषयी काही प्रश्न विचारले गेले तेव्हा तिने अभिनेता आणि अभिनेत्रींसोबत भेदभाव होत असतात, याविषयी स्पष्टच मत व्यक्त केले. तिने मत व्यक्त करत सांगितले की, “मी मीडियाला सतत विचारायचे की, तुम्ही अभिनेता आणि अभिनेत्रीमध्ये फरक का करता? , जेव्हा अमिर खान 2 ते 3 वर्षाचा ब्रेक घेऊन एका मोठ्या चित्रपटासोबत परत येतो तेव्हा तुम्ही त्याला आमिरचं कमबॅक असं का उच्चारत नाही.”

 

View this post on Instagram

 

रवीनाने काही दिवसांपीर्वी व्हिडिओ कॉलच्या सत्रात ओटीटी माध्यमावर काही मुद्दे मांडले होते, तेव्हा तिच्या सत्रामध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) देखिल सामिल झाले होते. ‘ओटीटीवर काम करण्यासठी वयाचं बंधन नाही, ना कोणत्याच स्टारडमचं. इथे फक्त अभिनय महत्वाचा मानला जातो. ओटीटीवर कथाच हिरो आहे आणि तिला प्रेक्षकांपर्यत कसं पोहोचवायचं हे महत्वाचं आहे. ईथे कमाइला देखिल महत्व नाही आणि कोणी किती बिझनेस केला याचं देखिल टेन्शन ओटीटीवर नसतं.’ अशा मुद्दे अभिनेत्रीने स्पष्ट केले होते.

 

 

View this post on Instagram

 

रविनाने पुढे सांगितले की, “ओटीटी बाीतीत हे खरं असं तराही चित्रपटामध्येही फार काही महत्वाचं नाही. कोणीही 30 सेकंदाच्या वर सिक्स पॅक आणि फिगर लक्षात ठेवत नाही. प्रेक्षक एका ठराविक काळानंतर चित्रपटातील चांगल्या कंटेटचा शोध घेत असतात. मला वाटतं की, वय आणि फिगर ओटीटीवर खूपच दुय्यम मानल्या जातात. पंकज त्रिपाठी स्वतःचे कौतुक करण्यापासून कोसो दूर राहतात. आणि कोणी केली तरी ते फारच विनम्र असतात”.

रविनाच्या अशा वक्तमुळे अनेक प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे, त्यामुळे रवीना खूपच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिने देखिल हाच मुद्दा अचलुन वक्त केले होते. मात्र, तिला फार काही प्रतिसाद मिळाला नाही. आता पुन्हा एकदा यामुद्यावर रवीना टंडनने आवाज उठवला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बाई वाड्यावर…’ फेम मानसी नाईक घटस्फोट? सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण
‘मायके गयी थी ससुराल लौटी हुॅं’; म्हणत अर्चना गौतमची बिग बॉसच्या घरता धमाकेदार एंट्री

हे देखील वाचा