Monday, March 4, 2024

‘मायके गयी थी ससुराल लौटी हुॅं’; म्हणत अर्चना गौतमची बिग बॉसच्या घरता धमाकेदार एंट्री

लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस 16‘ ला सध्या एक नावीन वळन आले आहे. काही दिवसांपूर्वीच शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्या भांडणाने पूर्ण घराला डोक्यावर उचलले होते. यामध्ये अर्चनाने शिवला मारहाण देखिल केली आणि स्वत:च्या चुकीमुळे तिला घराबाबेर देखिल काढण्यात आले होते. मात्र, शनिवार (दि, 12 नोव्हेंबर) दिवशी प्रसारित झालेल्या भागामध्ये घडलेल्या घटनेच्या दोन्ही बाजू मांडून शिव आणि अर्चनाची समान चुकी निघाल्यामुळे अर्चनाला बिग बॉसने पुन्हा एक संधी दिली आहे.

बिग बॉस (Bigg Boss) घरातील सगळ्या मस्तीखोर सदस्य अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam)  हिने आपल्या दमदार खेळीमुळे अनेक प्रेक्षकांवर राज्य करत आहे, जेव्हा हिला घरातून बाहेर काढले तेव्हा अनेक प्रेक्षकांनी तिला परत आनण्याची मागणी केली होती, कारण अर्चनामुळे कार्यक्रम पाहण्यासाठी मज्जा येते. अर्चना परतल्यानंतर प्रियंका चहर चौधरी (Priyanka Chahar choudhary) आणि सौंदर्या शर्मा (Soundarya Sharma) खूपच आनंदी होतात मात्र, घरातील काही सदस्य अर्चना परतल्यामुळे नाराज असतात. नुकतंच या भागाचा एक प्रोमो कलर्स टीव्हीने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

प्रदर्शित झालेल्या व्हिडिओमध्ये घरातील अर्चना परतल्याने साजिद खान (Sajid Khan) प्रियंका आणि सौंदर्या यांच्याशी वाद घालतात आणि यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटतो तेवढ्यातच अर्चनाची धमाकेदार एंट्री होते आणि सगळ्यांशी गळाभेट करते आणि म्हणते की, “मायके गयी थी अब ससुराल लौट गई” तिच्या डायलॉगने असे वाटत आहेMC Stan की, यापुढील भागामध्ये नक्कीच अर्चना काही तरी धमाकेदार करणार आहे. कारण ती एकटीच अनेकांना सरळ करण्यची हिम्मत ठेवते आणि तिच्यामध्ये ते करुन दाखवण्याची धमकही आहे.

 

View this post on Instagram

 

अर्चना परतल्यामुळे निमरित कौर (Nimrat Kaur),टीना दत्त (Tina Dutta), शालिन भनोट (Shalin Bhanot), आणि एमसी स्टॅन (MC Stan) यांनी तिचे कौतुक करत तिच्या विरोधात ऊभे आहेत. त्याशिवया शिव देखिल अर्चनाला सडेतोड उत्तर देण्यसाठी योजना बनवण्याची तयारीला लगला आहे. त्यामुळे प्रेक्षक पुढील भाग पाहण्यासाठी खूपच उत्सुक झाले आहेत. प्रेत्रकांनाही अर्चना परतल्याने घरामध्ये नेमकं काय काय घडेल याची आतुरतेने वाट पाहात आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पुढचा प्रवास खडतर असेल, तर…’, म्हणत अमेय वाघने वाढदिवशी स्वतःलाच दिली ‘ही’ खास भेट
…म्हणून शूटींगच्या सेटवर फराह खानने लगावली होती जुही चावलाच्या कानशिलात; अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा