हिंदी सिनेसृष्टीत ‘किंग खान’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान होय. शाहरुखला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. शाहरुखने फक्त भारतातच नाही, तर जगभरात आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. मागील 4 वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेला ‘रोमान्स किंग’ आता पुनरागमन करतोय. त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तो लवकरच ‘पठाण’ या सिनेमात झळकणार आहे. अशात शाहरुख सौदी अरेबियातील रेड सी फिल्म फेस्टिव्हल 2022मध्ये स्पॉट करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात शाहरुखला त्याच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. मात्र, यादरम्यान शाहरुखला पाहून हॉलिवूड अभिनेत्री शेरॉन स्टोन आनंदाने किंचाळली. आता हा व्हिडिओ व्हायरल होतोय.
शाहरुख खानसोबत दिसली शॅरोन स्टोन
झाले असे की, हॉलिवूड अभिनेत्री शॅरोन स्टोन (Sharon Stone) हीदेखील या पुरस्कार सोहळ्यात सामील झाली होती. ती शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या बाजूलाच बसली होती. मात्र, त्यावेळी तिचे किंग खानवर लक्ष गेले नाही. जेव्हा होस्टने शाहरुखचे स्वागत केले, तेव्हा त्याने उभे राहून प्रेमाने ती कृतज्ञता स्वीकारली. यावेळी शाहरुखला पाहून शॅरोन भलतीच आनंदी झाली. यावेळी ती आनंदाने किंचाळताना दिसली. तिने यावेळी ‘ओह माय गॉड’ असे उद्गारही काढले. दुसरीकडे, शाहरुखनेही शॅरोनला आपल्या सीटवरून उठून अभिवादन केले. यानंतर शॅरोनने शाहरुखला देसी अंदाजात नमस्ते केले.
View this post on Instagram
काजोलही झाली होती पुरस्कार सोहळ्यात सामील
गुरुवारी (दि. 01 डिसेंबर) रात्री काजोलनेही रेड सी फिल्म फेस्टिव्हल 2022मध्ये (Red Sea Film Festival 2022) एन्ट्री घेतली होती. तिच्या ब्लॉकबस्टर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा या सोहळ्यातील ओपनिंग सिनेमा होता. सोहळ्याच्या पहिल्या दिवसाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान शाहरुख आणि काजोल हे रेड कार्पेटवर एकत्र दिसले. दोघांनाही एकत्र पाहणे चाहत्यांसाठी जणू पर्वणीच असते.
शाहरुखचे आगामी सिनेमे
शाहरुख खानच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तो सिद्धार्थ आनंद यांच्या ऍक्शन थ्रिलर ‘पठाण’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा 25 जानेवारी, 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त शाहरुख अभिनेत्री नयनतारासोबत ऍक्शन थ्रिलर ‘जवान’ सिनेमातही झळकणार आहे. हा सिनेमा 2 जून, 2023 रोजी रिलीज होणार आहे. तसेच, शाहरुखच्या खात्यात ‘डंकी’ हा तिसरा सिनेमादेखील आहे. यामध्ये त्याच्यासोबत तापसू पन्नू ही मुख्य भूमिका साकारणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
अपघातानंतर आता कशीये जुबिन नौटियालची तब्येत? हॉस्पिटलच्या बेडवरून फोटो शेअर करत म्हणाला…
भारीच! एव्हरग्रीन अभिनेत्री वहिदा रेहमानच करायच्या देव आनंद यांच्याशी फ्लर्ट; म्हणायच्या, ‘तुम्ही…’