काही कलाकार हे अनेकदा स्वत:ला फक्त अभिनयापुरतेच मर्यादित ठेवतात. मात्र, काही कलाकार असेही असतात, जे देशात घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर निर्भीडपणे आपली मतं मांडतात. या कलाकारांमध्ये मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या सुमीत राघवन याचाही समावेश होतो. सुमीत सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्यावरून तो प्रत्येक घडामोडींवर व्यक्त होतो. अशात त्याने टीव्ही पत्रकार प्रसन्न जोशी याच्या एका ट्वीटवर सडेतोड प्रत्युत्त दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊया…
अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghvan) याचा मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाला पाठिंबा आहे. यामुळे भलताच वादंग निर्माण झाला होता. या प्रकल्पाला विरोध दर्शवणाऱ्यांंवर अभिनेत्याने सोशल मीडियावरून अनेकदा टीकास्त्र डागले आहे. याविषयी त्याने एक ट्वीट केले होते, जे भलतंच चर्चेचा विषय ठरतंय. यामध्ये कारशेडला विरोध दर्शवणाऱ्या आंदोलकांची थट्टा उडवल्याचे दिसते.
काय म्हणाला होता सुमीत?
अभिनेत्याने एक ट्वीट रिट्विट केले, ज्यामध्ये अरुण पुदूर नावाच्या एका व्यक्तीने व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने तो व्हिडिओ शेअर करत कॅप्शन दिले होते की, “फ्रेंचचे नागरिक क्लायमेट चेंज ऍक्टिव्हिस्ट लोकांची काळजी घेताना.” यामध्ये एक व्यक्ती आंदोलन करणाऱ्यांना मारताना दिसतोय.
हेच ट्वीट रिट्विट करत सुमीतने लिहिले की, “आपण आरे आंदोलकांसोबतही हेच करायला पाहिजे होतं. हे बोगस फालतू लोक डोक्यावर चढले होते. कामाचे ना धामाचे.”
Aarey activists ke saath yahi karna chahiye tha hum logon ne.. Sar pe chadh ke baith gaye they ye bogus faltu log..
Kaam ke na kaaj ke…zholachaap… https://t.co/acXrPiDQw3— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) December 1, 2022
सुमीतच्या ट्वीटवर टीव्ही पत्रकार प्रसन्न जोशीचा निशाणा
सुमीतचे हे ट्वीट टीव्ही पत्रकार प्रसन्न जोशी (TV Journalist Prasanna Joshi) याने रिट्विट केले. तसेच, त्यात अभिनेत्याला टॅग करत म्हटले की, “आरे कार शेडविरोधात आंदोलन करणारे फक्त प्रौढ नव्हते. तरुण मुलं मुली, लहानगे हेही यात होते. आणि तुम्ही ही भाषा वापरताय?”
आरे कार शेडविरोधात आंदोलन करणारे फक्त प्रौढ नव्हते. तरुण मुलं मुली, लहानगे हेही यात होते. आणि @sumrag तुम्ही ही भाषा वापरताय? https://t.co/yp95uOeIJt
— Prasanna Joshi (@PrasannJOSHI) December 3, 2022
प्रसन्न जोशीला सुमीचे प्रत्युत्तर
प्रसन्न जोशी (Prasanna Joshi) याच्या ट्वीटला प्रत्युत्तर देत सुमीतने ट्वीट केले की, “प्रसन्न, मित्रा… काड्या घालण्याची कामं नको करू… कळलं का? तुला ठाऊक आहे मला काय म्हणायचं होतं… उगाच फाटे फोडू नको.”
प्रसन्न,मित्रा… काड्या घालण्याची कामं नको करू.. कळलं का? तुला ठाऊक आहे मला काय म्हणायचं होतं.. उगाच फाटे फोडू नको. https://t.co/K4pEurQ5BP
— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) December 3, 2022
आता सुमीतच्या या ट्वीटवर काहीजण त्याला पाठिंबा देत आहेत, तर काहीजण त्याच्यावर निशाणा साधत आहेत. (marathi actor sumeet raghavan replied to tv journalist prasanna joshi tweet)
सुमीत राघवन याचे सिनेमे
सुमीतच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने अनेक मराठी आणि हिंदी सिनेमात काम केले आहे. त्यात ‘बकेट लिस्ट’, ‘हॉलिडे’, ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘रंपाट’, ‘यू मी और हम’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
फोटोत दिसणाऱ्या ‘या’ मुलांना ओळखलं का? त्यांनी मोठेपणी गाजवलंय बॉलिवूड, मुली अन् सुनबाईही आहेत स्टार
‘वजन कमी कर जाड झालीयेस’, लेटेस्ट व्हिडिओत कंबर लचकवणाऱ्या सपनाच्या पोस्टवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट