Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

बॉलिवूडची ‘ट्रॅजेेडी क्वीन’ मीना कुमारी, जिचा आवाज ऐकून राज कपूरही विसरायचे डायलॉग्ज

बॉलिवूड मधील एक प्रसिद्ध नावं म्हणजे मीना कुमारी. कदाचित खूपच कमी वयात एवढी लोकप्रियता मिळवणाऱ्या मीना कुमारी या बॉलिवूडमधील पहिल्याच महिला असतील. बॉलिवूडमध्ये एवढं नाव कमावलं पण वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांना खूप परिश्रम करावे लागले आहेत. 39 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी सुख कमी आणि दुःखच जास्त अनुभवले आहे. मीना कुमारी यांचा जन्म 1 ऑगस्ट 1933 मध्ये मुंबई येथे झाला होता, परंतु आजच्याच दिवशी म्हणजेच 31 मार्च, 1972 रोजी बॉलिवूडमधील या ‘ट्रॅजेडी क्वीन’ने जगाचा निरोप घेतला. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी.

मीना कुमारी यांच्या आयुष्याची सुरुवातच संघर्षाने झाली. त्यांच्या जन्म झाला, तेव्हा त्यांच्या वडिलांची इच्छा होती की, त्यांना मुलगा व्हावा, जो त्यांच्या कुटुंबाचा वंश पुढे चालवू शकेल आणि वृद्धपणात आधार बनू शकेल. पण त्या वेळेस त्यांना मुलगी झाली. त्यांना आधीच दोन मुली होत्या. मीना कुमारी यांचा जन्म झाला, तेव्हा त्यांच्या वडिलांकडे अजिबात पैसे नव्हते.

त्यावेळी त्यांच्या वडिलांनी निराश होऊन दादरच्या जवळील एका मुस्लिम अनाथ आश्रमात मीना कुमारी यांना सोडले. पण अगदी काही मिनिटांनंतर त्यांना जाणवले की, हा तर त्या मुलीसोबत अन्याय होत आहे, तेव्हा त्यांनी मीना कुमारी यांना परत घरी आणले. जन्मानंतर खूप कमी वयात त्यांच्यावर जबाबदारी यायला लागली. त्या सुंदर होत्या. त्यावेळी त्यांना बाल कलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये काम केले. पैसे कमवू लागल्या. इथूनच त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली.

मीना कुमारी या दिसायला सुंदर तर होत्याच पण सोबतच त्यांनी त्यांच्या आवाजाने आणि अदांनी देखील बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली. एका दिग्दर्शकाने मीना कुमारीबद्दल बोलताना असे म्हटले होते की, दिलीप कुमारसारख्या अभिनेत्याला देखील स्थिर राहण्यास कठीण होते. अभिनेत्री मधुबाला यांनी म्हटले होते की, मीना कुमारी सारखा आवाज पूर्ण सृष्टीमध्ये कोणाचाच नाही.

मीना कुमारी यांनी त्यांच्या 33 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये 92 चित्रपटात काम केले आहे. ‘बैजू बावरा’, ‘परिनिता’, ‘चांदणी चौक’, ‘आजाद’, ‘दिल अपना और प्रीत पराई’, ‘कोहिनूर’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सौंदर्यासोबतच त्यांचा अभिनय देखील सगळ्यांना खूप आवडत असे. राज कपूर सारखे दिग्गज अभिनेते देखील त्यांच्या समोर डायलॉग विसरून जात असे.

मीना कुमारी यांची कमाल अमरोही यांच्यावर प्रेम होते. परंतु या दोघांचं नातं जास्त दिवस नाही टिकले. काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात कडवटपणा यायला लागला. ते मीना कुमार यांच्या बाबत खूप पझेसिव्ह होते. त्यांनी मीना कुमारी यांच्यावर खूप बंधने लादली होती. जसे की तिच्या मेकअप रूममध्ये कोणत्याही पुरुषाला जाण्यास त्यांनी मनाई केली होती.

व्यावसायिक क्षेत्रात सफल असलेल्या या अभिनेत्रीला वैयक्तिक आयुष्यात मात्र खूप कष्ट झेलावे लागले होते. प्रत्येक वळणावर आयुष्याने तिची परीक्षा घेतली. पण त्या प्रत्येक परीक्षेत पास झाल्या. खरंतर आयुष्य असं मोजून मापून नाही जगता येत. त्यासाठी आयुष्य प्रेम करणारी आणि जीव लावणारी व्यक्ती असावी लागते, परंतु हे त्यांच्या नशीबात नव्हतं.(lets know the fact about meena kumari)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांचा झाला ‘रहस्यमयी’ मृत्यू घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता मृतदेह

‘आदिपुरुषला बॉयकॉट करा’ म्हणत नेटकऱ्यांनी चित्रपटाच्या नव्या पोस्टरवरील ‘त्या’ चुकीवर घेतला आक्षेप

हे देखील वाचा