बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन नुकतीच ‘उप्स मोमेंट’ची शिकार झाली आहे. अभिनेत्री पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत गुनीत मोंगा आणि सनी कपूर यांच्या प्री-वेडिंग पार्टीत पोहोचली होती. ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये विद्या बालन सुंदर फुलांच्या साडीत दिसत आहे, तर सिद्धार्थ रॉय कपूर काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. दोघेही फोटो क्लिक करण्यासाठी पुढे सरकताच एक विचित्र घटना कॅमेऱ्यात कैद झाली.
खरं तर, विद्या (vidya balan) आणि सिद्धार्थ (siddharth roy kapur) पुढे जाताच तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने विद्याच्या साडीचा पल्लू पकडला. मात्र, विद्याने लगेच तिच्या पल्लूला पकडून तिच्याकडे ओढले. यात सिद्धार्थनेही तिची मदत केली. समोरून जाणार्या व्यक्तीला दोघांनी ओळखल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
व्हिडिओमध्ये, विद्या पुढे जाते आणि पॅपराजींकडे बघून हसते आणि सिद्धार्थ रॉय कपूर त्या माणसाला अभिवादन करताना दिसताे, जो नंतर विद्याच्या साडीचा पल्लू पकडतो. हे पाहून सिद्धार्थला धक्काच बसताे. अचानक त्याच्या हसऱ्या-हसणाऱ्या चेहऱ्यावरचे भावही बदलतात. अचानक घडलेल्या या घटनेने दोघेही हैराण झाल्याचे व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे.
View this post on Instagram
विद्या तिची साडी फिक्स करते आणि त्यानंतर हसत पोझ देते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशा परिस्थितीत अनेक युजर्स विद्याच्या या स्टाइलचे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर अनेकजण या व्यक्तीबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. अनेकांनी सांगितले की, “अभिनेत्रीने परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली.” तर दुसरीकडे या व्यक्तीने विद्या आणि सिद्धार्थची माफी मागायला हवी होती, असे अनेकांचे म्हणणे आहे.
विद्या बालन हिच्या चित्रपट काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर अभिनेत्रीने ‘द डर्टी पिक्चर’, ‘भूल भुलैया’, ‘जलसा’ यासारख्या दमदार चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. (bollywood actress vidya balan suffers oops moment in front of husband siddharth roy kapur as man pulls her saree pall)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
घटस्फाेटाच्या चर्चेवरून उर्मिला कोठारेचं माेठं वक्तव्य; म्हणाली, ‘ब्रेकअप झालं…’
शिव ठाकरेसाठी वीणा जगताप करणार ‘बिग बॉस 16’ मध्ये एंट्री, वाचा नवीन वाईल्ड कार्ड सदस्यांची यादी