सनी लिओनीने करीना कपूरसमोर व्यक्त केलं दुःख; म्हणाली, ‘माझ्या सवयीमुळे लाजिरवाणं व्हावं लागतं…’


सनी लिओनीने (Sunny Leone) आजच्या काळात फिल्मी जगतात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. चाहत्यांनी तिचा भूतकाळ विसरून तिला खूप प्रेम दिले. सनीने भलेही चित्रपटांमध्ये कमी अभिनय केला असेल, पण तिने किंग खानपासून अनेक बड्या स्टार्सच्या चित्रपटांमध्ये स्पेशल नंबर केले आहेत. सनी खूप साधी आहे आणि ती तिच्या मनातील बोलण्यास अजिबात लाजत नाही. यामुळेच सोशल मीडियावर तिचे खूप मोठे चाहते आहेत, जे तिला प्रत्येक प्रसंगी तिला सपोर्ट करतात.

करीनासमोर मांडली आपली व्यथा
सनी लिओनी खूप बबली असली, तरी तिच्या एका सवयीमुळे ती खूप नाराज आहे. ज्याबद्दल तिने करीना कपूरच्या शो ‘व्हॉट वुमन वॉन्ट्स’मध्ये खुलासा केला होता. करीना कपूर खानसमोर तिची व्यथा मांडताना सनीने तिच्या वाईट सवयीबद्दल खुलासा केला आणि असेही सांगितले की, तिच्या एका सवयीमुळे तिला अनेकवेळा लाजिरवाणे व्हावे लागते. (sunny leone talk about her bad habit in kareena kapoor khan chat show)

करीनाने विचारला ‘हा’ प्रश्न
सनी लिओनी तिच्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती. तेव्हा करीनाने तिला विचारले होते की, “असे काय आहे जे तू तुझ्या आयुष्यात कधीही केले नाही. पण तू ते करायला हवे होते, असे तुला वाटते?” करीनाच्या या प्रश्नाला उत्तर देताना सनी म्हणाली की, ती तिच्या खऱ्या आयुष्यात खूप अंतर्मुख आहे आणि सामाजिकदृष्ट्या फारशी सक्रिय नाही.

सनी लिओनी करीनाला म्हणाली, “मी सुरुवातीलाच एक गोष्ट करायला हवी होती ती म्हणजे सामाजिक असणे. मी लोकांना भेटण्यात आणि बोलण्यात खूप वाईट आहे. मी खऱ्या आयुष्यात फार कमी लोकांशी बोलते. यामुळे मला माझ्या सामाजिक जीवनात खूप पेच सहन करावा लागतो”, असे सनी लिओनीने सांगितले.

करीना कपूरशी बोलताना, सनीने तिच्या पती डॅनियल वेबरचे कौतुक केले. सनीने सांगितले की, तिच्या आयुष्यात डॅनियल आल्याने ती स्वतःला खूप भाग्यवान समजते. सनीने सांगितले की, डॅनियल केवळ घराचीच नाही तर मुलांचीही जबाबदारी घेतो. मुलांचे डायपर बदलण्यापासून ते स्वयंपाकघरातील भांडी धुण्यापर्यंत, सर्व गोष्टीत तो तिला मदत करतो.

सनीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती वादग्रस्त शो ‘बिग बॉस’चा एक भाग बनली होती. त्यानंतर महेश भट्ट यांनी २०१२ साली ‘जिस्म २’ या चित्रपटातून तिला पहिली संधी दिली होती. या चित्रपटाशिवाय सनीने ‘रागिनी एमएमएस २’, ‘कुछ कुछ लोचा है’, ‘वन नाईट स्टँड’, ‘एक पहेली लीला’, ‘हेट स्टोरी २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!