सध्या सगळीकडेच ‘फीफा विश्वचषक‘ सामना पाहाण्साठी सगळीकडे उत्सुकतेचे वातावरण पाहाय मिळत आहे. फुटबॉल प्रेमी अनेक सेलिब्रीटी देखिल या सामन्यासाठी उत्सुक आहेत. त्यापैकीच बॉलिवूडमधील हॅंडसम हंक म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन देखिल फुटबॉलचा मोठा चाहता असून त्याने लाईव्ह सामना पाहाण्यासाठी थेट कतारला उडाण भरली आहे.
विदेशातच नाही तर भारतामध्येही फुटबॉलचे अनेक चाहते आहेत. कतारमध्ये फीफा विश्वकप (Fifa World Cup Final 2022) हा सामना पार पडाणार असून अर्जेटिना आणि फ्रांन्समध्ये हा धमाकेदार सामना कतारच्या आयकॉनिक स्टेडियाममध्ये पार पडणार आहे. त्यामुळे हा सामना पाहाण्यासठी बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी कतारला धाव घेतली आहे.
कार्तिकने रविवार (दि,18 डिसेंबर) रोजी आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत तो कतारला निघला आहे असे त्याने सांगितलं आहे. त्याने विमानात बसलेला एक फोटो शेअर केला असून कार्तिकच्या हातामध्ये कतारचं टिकेट दिसून येत आहे. त्याचा फोटो आणि चेहऱ्यावरचे हास्य पाहून असे दिसून येत आहे की, फ्रांन्स आणि अर्जेटीनामधील फीफा विश्वकप2022 होणाऱ्या सामन्यासाठी कार्तिक खूपच उत्सुक दिसत आहे.
यावर्षी फीफा वर्ल्ड कप फायनलमध्ये क्लोसिंग सेरेमनीच्या कार्यक्रमामध्ये बेली डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) आपल्या डान्सने प्रेक्षकांचे मनोरंज करण्साठी येणार आहे. त्याशिवाय ‘पठाण‘ स्टारर शाहरुख खान (Shaharukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) देखिल फुटबॉलच्या या धमाकेदीर सामन्याचा आनंद लुटण्यासाठी स्टेडियममध्ये हजर राहणार आहे. त्याशिवाय वरुन धवन (Varun Dhawan) याने सांगितले एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, लियोनेल मेसी (Lionel Messi) साठी हा फिफा विश्वचषक अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहे.
फीफा विश्वचषकामध्ये फ्रांन्स आणि अर्जेटिनामध्ये खूप धमाकेदार सामना होणार आहे. त्यामुळे अनेकांना आतुरता लागली आहे की, कोणता देश विजेता ठरणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘माझी मुलं मुस्लिम हाेणार की हिंदू…’, जिम ट्रेनरशी लग्न केल्यानंतर अभिनेत्री ट्राेल, देवाेलिनानं दिलं चाेख उत्तर
शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केतकीची पोस्ट चर्चेत; म्हणाली, ‘सनातनी हिंदू मारला जातोय’