Wednesday, December 6, 2023

‘माझी मुलं मुस्लिम हाेणार की हिंदू…’, जिम ट्रेनरशी लग्न केल्यानंतर अभिनेत्री ट्राेल, देवाेलिनानं दिलं चाेख उत्तर

टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी तिच्या लग्नामुळे सतत चर्चेत असते. अभिनेत्रीने अलीकडेच तिचा प्रियकर शाहनवाज शेखसोबत लग्न केल्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र, तिने लग्नाच्या दिवसापर्यंत नवरदेवाबद्दलचा सस्पेन्स कायम ठेवला. बहुतेकांना वाटत होते की, ती तिच्या ‘साथ निभाना साथिया’चा सहकलाकार विशाल सिंगसोबत लग्न करत आहे, परंतु अभिनेत्रीने अचानक तिच्या पतीची ओळख करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. देवोलिना भट्टाचार्जी आता मुस्लीम पुरुषाशी लग्न केल्यामुळे ट्रोलच्या निशाण्यावर आहे.

अभिनेत्री देवोलीना (devoleena bhattacharjee) हिचे शाहनवाजसाेबत झालेल्या लग्नाबद्दल युजर्स विचित्र प्रश्न विचारत आहेत. अशातच एकाने अभिनेत्रीला विचारले की, “तुझी मुले हिंदू होतील की मुस्लिम?” मात्र, यानंतर काहीवेळातच युजरने त्याचे ट्विट डिलीट केले, पण हे ट्विट अभिनेत्रीच्या नजरेपासून लपून राहू शकले नाही आणि अभिनेत्री देवोलीनाने सडेतोड उत्तर देत युजरला चांगलेच फाईलवर घेतले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

ट्रोलवर प्रतिक्रिया देताना देवोलीनाने याला ‘टॉक्सिक’ म्हटले आहे. ती लिहिते, “माझी मुले हिंदू होतील की मुस्लिम, हे विचारणारे तुम्ही कोण? आणि जेव्हा तुम्हाला मुलांची एवढी काळजी वाटते, अनेक अनाथाश्रम आहेत, तेव्हा जा, दत्तक घ्या आणि स्वतःनुसार धर्म आणि नाव ठरवा. माझे पती, माझे मूल, माझा धर्म, माझे नियम. तू कोण आहेस? #टॉक्सिक ”

devoleena-bhattacharjee

देवोलीना आणि शाहनवाज यांच्या लग्नावर बरीच टीका होत आहे. ‘लव्ह जिहाद’वर भाषण देण्यासोबतच लोक तिची तुलना श्रद्धा वालकरशीही करत आहेत.(tv actre`s`s devoleena bhattacharjee slams user who asked if her kids will be hindu or muslim actress says mera bachcha mera dharm aap kaun)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शाहरुखच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! ‘किंग खान’ला झाले इन्फेक्शन, फक्त भात खाऊन काढतोय दिवस

बॉलीवूडची गुणी कलाकार रिचा चढ्ढाने गॉडफादरशिवाय कशी गाठली यशाची शिखरे? वाचा प्रेरणादायी स्टोरी

हे देखील वाचा