Thursday, April 18, 2024

‘हेरा फेरी 3’ बद्दल मोठे अपडेट! चित्रपटात काम करण्यासाठी कार्तिक आर्यनने ठेवली ‘ही’ अट

‘हेरी फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’च्या अफाट यशानंतर आता निर्माते ‘हेरी फेरी 3’ बनवण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ‘हेरा फेरी 3’ची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हेरी फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही लोक विसरू शकलेले नाहीत. दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरले. त्यामुळेच ‘हेरी फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ हे ब्लॉकबस्टर चित्रपट ठरले. माध्यमातील वृत्तानुसार, आता बातम्या येत आहेत की, निर्माते ‘हेरी फेरी 3’ आणण्याचा विचार करत आहेत. ‘हॅरी फेरी 3’ द्वारे निर्माते पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, यावेळी या चित्रपटात अक्षय कुमार नाहीतर कार्तिक आर्यनला कास्ट केल्याची चर्चा समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून बातम्या येत आहेत की, अक्षय कुमारऐवजी कार्तिक आर्यन ‘हेरी फेरी 3’मध्ये कॉमेडी करताना दिसणार आहे. म्हणजेच कार्तिक आर्यन आता अक्षयची जागा घेऊ शकतो. मात्र, जेव्हापासून या बातम्या मीडियामध्ये येऊ लागल्या आहेत, तेव्हापासून अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळत आहे, तर कार्तिक आर्यनच्या चाहत्यांच्या आनंदाला सीमाच उरली नाही. मात्र, या सगळ्याच्या दरम्यान आता ‘हॅरी फेरी 3’ चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, कार्तिक आर्यन ‘हेरा फेरी 3’मध्ये दिसणार की नाही, हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, हा चित्रपट साईन करण्यापूर्वी अभिनेत्याने निर्मात्यांसमोर एक अट ठेवली आहे. खरं तर स्क्रिप्ट वाचल्यानंतरच कार्तिक आर्यन या चित्रपटात काम करणार की, नाही हे ठरवेल. दुसरीकडे, वृत्तांवर विश्वास ठेवला तर, निर्मात्यांनी कार्तिकला असेही सांगितले आहे की, तो या चित्रपटातील त्याची भूमिका अक्षय कुमारच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी ठेवणार आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, कार्तिकपूर्वी वरुण धवनलाही या चित्रपटासाठी अप्रोच करण्यात आले होते, पण त्याला अक्षय कुमारची जागा घ्यायची नव्हती. ( karthik aryan put a big condition in front of the makers for heri pheri 3 then he will sign the movie)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
लग्नाच्या 18 वर्षानंतर हे कलाकार जाेडी पहिल्यांदाच झाले आई-बाबा, शेअर केला मुलीचा व्हिडिओ

फटाके वाजवा रे! केएल राहुल अथियासाेबत जानेवारी महिन्यात्यात अडकणार लग्न बंधनात?

हे देखील वाचा