Tuesday, May 28, 2024

वरुन धवनच्या घरात हलणार पाळणा? बिग बॉसच्या मंचावर सलमान खानने केला खुलासा

प्रसिद्ध अभिनेता वरुन धवन याचा आगामी येणारा चित्रपट ‘भेडीया’मुळे खूपच चर्चेत आहे. काही दिवासांपूर्वीच प्रदर्शित झालेलं गाणं ‘ठुमकेश्वरी’ याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. भेडीया चित्रपटामध्ये वरुन सोबत अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सध्या हे दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतंच या कलाकारांनी बिग बॉसच्या मंचावर हजेरी लावली होती. तेव्हा अभिनेता सलमान खान याने या बातमीचा खुलासा केले होतो.

कलर्स टीव्हीने नुकत्याच पार पडलेल्या भागाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला होता ज्यामध्ये सलमान खान (Salman Khan), क्रिती सेनन (Kriti Sanon), आणि वरुन धवन (Varun Dhawan) यांच्या सोबत एक खेळत खेळत असतो ज्यामध्ये सलमान क्रिता आणि वरुनच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना चित्रपटाविषयी हिंट देत असतो. त्यामध्येच सलमान वरुनला एक सॉफ्ट टॉय देतो त्यावर वरुन म्हणतो की, “याचे मी काय करु. अजून तरी मला मुलबाळ नाहीए.”

 

View this post on Instagram

 

वरुनच्या अशा वक्तव्यानंतर सलमान म्हणतो की, “अता हा आला आहे, आता बाळही लवरच येईल.” यानंतर वरुन खूप लाजतो. सलमानच्या अशा बोलण्यावरुन प्रेक्षकांनी हिंट मिळाली आहे की, वरुन आणि नताशा देखिल लवकरच आई-बाबा बणनार आहेत. मजाक मजाकमध्ये सलमानने वरुनच्या वैयक्तीक आयुष्तील महत्वाच्या मुद्द्यवर खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

नुकतंच बॉलिवूडमधील आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbeer Kapoor), बिपाशा (Bipasha Basu)- करण ग्रोवर (Karan Grover), देबिना (Debina Bonnerjee)आणि गुरमित (Gurmeet Choudhary)आई बाबा बनले आहेत. तर यानंतरचा नंबर वरुनचा असेल का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. अजूनपर्यत वरुनने या गोष्टीबद्दल काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
कस्टम ड्युटी अधिकाऱ्यांच्या वक्तव्यानंतर शाहरुख खानने घेतला सुटकेचा श्वास…
सई ताम्हणकरच्या नव्या फोटोंची चाहत्यांना भुरळ

हे देखील वाचा