जेव्हा एखादा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा दोन गट पडतात. एक त्या मुद्द्याच्या बाजूने असतो, तर दुसरा मुद्द्याच्या विरोधात. असेच काहीसे सध्या सुपरस्टार शाहरुख खान याच्या ‘पठाण‘ या सिनेमाबद्दल घडत आहे. या सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोण हिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून भलत्याच वादाला तोंड फुटले आहे. काही लोक याचा विरोध करत अश्लील असल्याचे म्हणत आहेत, तर दुसरीकडे काही कलाकारांनी सिनेमाला पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये अभिनेत्री रत्ना पाठक यांचाही समावेश आहे. नुकतेच त्यांनी पठाण सिनेमाला विरोध दर्शवणाऱ्या टीकाकारांची शाळा घेतली.
शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या ‘पठाण’ (Pathaan) सिनेमातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) हे गाणे नुकतेच रिलीज झाले. यानंतर भाजपच्या अनेक मंत्र्यांनी दावा केला आहे की, या गाण्यात भगव्या रंगाचा अपमान करण्यात आला आहे. तसेच, हा रंग हिंदू समुदायासाठी पवित्र मानला जातो. तेव्हापासूनच या वादाला तोंड फुटले. मात्र, स्वरा भास्करपासून ते बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी ‘पठाण’ सिनेमाला पाठिंबा दिला. आता रत्ना पाठक (Ratna Pathak) यांनी एका माध्यम संस्थेला दिलेल्या मुलाखतीत ट्रोलर्सला फटकारले. तसेच, म्हणाल्या की, त्या दिवसाची वाट पाहत आहेत, जेव्हा द्वेष लोकांना एकदाच दमवून टाकेल.
‘कच्छ एक्सप्रेस’ या त्यांच्या पहिल्याच गुजराती सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्यांनी एका माध्यम संस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी देशाच्या परिस्थितीवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या की, “लोकांकडे त्यांच्या ताटात अन्न नाहीये, पण इतर जो कपडे परिधान करत आहे, त्याबद्दल ते राग व्यक्त करू शकतात.” यावेळी त्यांना विचारले गेले की, जेव्हा एखाद्या कलाकाराला समजते की, त्याचा ड्रेस देशात चर्चेचा मुद्दा बनला आहे, तेव्हा त्याला कसे वाटते? यावर त्या म्हणाल्या की, “जर या गोष्टी तुमच्या डोक्यात असतील, तर मी म्हणेल की, आपण खूपच मूर्ख अशा काळात जगत आहोत. मी या गोष्टीबद्दल जास्त बोलावे किंवा जास्त महत्त्व द्यावे असा हा मुद्दा नाहीये.”
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “परंतु मी अपेक्षा करत आहे की, भारतात यावेळी जितकेही समजदार लोक दिसत आहेत, त्यापेक्षा खूप जास्त आहेत. ते येणाऱ्या काळात निघून गेले आहेत. कारण, जे काही घडत आहे, ती भीतीची, बहिष्काराची भावना जास्त काळ टिकणार नाहीये. मला वाटते की, एका मर्यादेपेक्षा जास्त द्वेष सहन करू शकत नाही. तेव्हा एक विद्रोह होतो, परंतु काही काळानंतर तुम्ही याची घृणा करून थकून जाता. मी तो दिवस येण्याची वाट पाहत आहे.”
View this post on Instagram
रत्ना पाठक यांच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर त्या सध्या त्यांच्या ‘कच्छ एक्सप्रेस’चे जोरदार प्रमोशन करत आहेत. त्यांचा हा सिनेमा 6 जानेवारी, 2023 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. दुसरीकडे, ‘पठाण’बद्दल बोलायचं झालं, तर हा सिनेमा पुढील वर्षी 25 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमातून शाहरुख खान तब्बल 4 वर्षांनंतर पुनरागमन करत आहे. तो शेवटचा 2018 सालच्या ‘झिरो’ या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसला होता. (movie pathaan besharam rang shahrukh khan deepika padukone controversy actress ratna pathak slams trolls)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘इतके पैसेवाले असूनही कोर्टात लग्न केले आणि आम्ही मध्यमवर्गीय…’, नवविवाहित अभिनेत्री जोरदार ट्रोल
काय सांगता! ट्रेंड होत असलेल्या ‘मेरा दिल ये पुकारे’ गाण्यावर अमिताभ 1999मध्येच थिरकलेले? पाहा व्हिडिओ