Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बिग बाॅस 16। प्रियांकाला सर्वात प्रिय काय, 25 लाख की अंकीत गुप्ता?

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे ‘बिग बॉस 16‘चे आगामी एपिसोड्स खूपच इंटरेस्टिंग होत आहेत. जसजसा सीजन अंतिम फेरीकडे सरकत आहे तसतसे विजेत्याबाबत लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात एकापेक्षा एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. आगामी एपिसोडमध्ये स्पर्धक प्रियंका चौधरी हिला खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. या सीझनमध्ये प्रियांका आणि अंकितच्या ‘स्पेशल केमिस्ट्री’ची बरीच चर्चा झाली आहे, पण आता प्रियांका गोंधळात पडणार आहे. होय, आगामी एपिसोडमध्ये प्रियांकाला 25 लाख रुपये आणि तिचा खास मित्र अंकित गुप्ता यांच्यापैकी एक निवडण्याचा पर्याय दिला जाणार आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, गुलाबी टी-शर्ट घातलेली प्रियांका कन्फेशन रूममध्ये बसलेली दिसत आहे, तर घरातील इतर सदस्य तिला टेलिव्हिजनवर पाहत आहेत. दरम्यान, बिग बॉस तिला सांगतो की, “जर तिने ठरवले तर तीला गमावलेले बक्षीस रक्कम परत मिळू शकते, पण जर तिने तसे करायचे ठरवले तर, त्यासाठी तिला तिचा मित्र अंकितला घराबाहेर काढावे लागेल.”अंकित गुप्ता या आठवड्यात घरातून बाहेर पडण्यासाठी नॉमिनेटे झाला आहे.

बिग बॉस उलटी गिनती करतात, अशा स्थितीत प्रियांका खूपच गोंधळलेली दिसते. दुसरीकडे, अखेर काय होईल, अशी अपेक्षा घरातील सदस्य व्यक्त करत आहे. प्रियांकाला अशा अवस्थेत पाहून अर्चना गौतम टाळ्या वाजवताना आनंदी दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

इन्स्टाग्रामवर आगामी प्रोमो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “काय निवडेल प्रियंका? गमवलेले 25 लाख की, देईल मित्राला साथ?”

प्रियंका प्रत्येक मुद्द्यावर आपले मत उघडपणे व्यक्त करते. प्रियांकाबद्दल प्रेक्षकांचे मतही सकारात्मक आहे. माध्यमातील वृत्तानुसार, प्रियांका 10 व्या आठवड्याच्या शेवटपर्यंत आघाडीवर आहे. शोमधील अंकित गुप्तासोबतची तिची मैत्री चाहत्यांना आवडते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विंडो सीटसाठी क्रांतीने विमानात घातला राडा, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली ‘ही’ सुवर्ण संधी

फक्त सिनेमाच ब्लॉकबस्टर, 400 कोटींच्या ‘कांतारा’च्या कलाकारांना दिले फक्त ‘एवढे’ मानधन; आकडा करेल हैराण

हे देखील वाचा