Saturday, June 29, 2024

हिरवी साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊज घालून ‘या’ गाण्यावर थिरकली अभिनेत्री, पाहा तिचे झक्कास ठुमके

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिला कोणत्याही कारणाशिवाय खुश राहायला आणि एकटीच पार्टी करायला खूप आवडते. स्वरा ही सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणत सक्रिय असते. आपले अनेक फोटो आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा नुकताच एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘वीरे दि वेडिंग’ या चित्रपटातील ‘तारीफा’ या गाण्यावर एकटीच झक्कास डान्स करताना दिसत आहे.

स्वराने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने असे कॅप्शन दिले आहे की, “पार्टीनंतर एकटीच, असंच. काही कारण नसणे देखील एक चांगले कारण आहे.” स्वरा या व्हिडिओमध्ये खूप सेंशुअस दिसत आहे. पण काही जणांनी तिला खूपच ट्रोल केले आहे.

स्वरा भास्कर ही सोशल मीडियावर अनेक गोष्टींमुळे चर्चेत येत असते. अनेकजण तिला ट्रोल देखील करत असतात. पण ती त्यांना तोंडावर उत्तर देखील देत असते. या व्हिडिओमध्ये तिने हिरव्या रंगाची साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे, तर अनेकांनी तिला ट्रोल देखील केले आहे.

तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘तनू वेड्स मनू’, ‘चिल्लर पार्टी’, ‘रांझना’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘नील बटे सन्नाटा’, ‘अनारकली ऑफ आरा’, ‘वीरे दी वेडिंग’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तिला ‘रांझना’ या चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळाली. ती ‘शोर कोरमा’ या तिच्या आगामी चित्रपटाची शूटिंग करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-म्हणून सपनाला देसी क्वीन म्हणतात! अवघ्या काही दिवसांत सपनाच्या ‘या’ गाण्याला मिळालेत २ कोटी व्ह्यूज

-‘भेडिया’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री क्रिती सेननने धक्का दिल्यानंतर पाण्यात पडता पडता वाचला वरुण धवन, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-मेगा स्टार चिरंजीवी आणि राम चरणच्या ‘आचार्य’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीझ, अभिनेत्याच्या डान्स मुव्हजची होतेय प्रशंसा

हे देखील वाचा