देसी क्वीनच्या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असणारी अभिनेत्री सपना चौधरी. तिचे भारतातील कानाकोपऱ्यात फॅन्स आहेत. ती तिच्या डान्स व्हिडीओ व्यतिरिक्त अनेक हरियाणवी गाण्यावर देखील धमाल करताना दिसत असते. आताच तिचा एक थ्रो बॅक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘घुंगट की ओठ मे’ या गाण्यावर स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. हे एक हरियाणवी गाणे आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.
सपना चौधरीच्या या डान्स व्हिडिओला त्रिमूर्ती कॅसेट्स यूट्यूब चॅनलवर पोस्ट केले आहे. या व्हिडिओच्या लोकप्रियतेचा अंदाज इथूनच लागतो की, या व्हिडीओला आतापर्यंत 2 कोटीपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की सपना चौधरी तिच्या युनिक स्टाईलमध्ये स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. सगळ्यांना तिचा हा डान्स खूपच आवडला आहे.
नुकतीच सपना चौधरीने भोजपुरी कलाकारांसोबत होळी साजरी केली होती. यात देखील तिने खूप मजा मस्ती केली होती. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या ‘रवी किशन’ आणि ‘मनोज तिवारी’ सोबत अँड टीव्हीवरील क्राईम सीरिज ‘मौका ए वारदात’ यामध्ये काम करत आहे.
सपना चौधरीने हरियाणवी ऑर्केस्ट्रा पार्टीसोबत तिच्या करीअरची सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू तिने हरियाणा आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये रागिणी या कार्यक्रमात भाग घेतला. त्यानंतर तिची लोकप्रियता खूप वाढली. सपना चौधरी ही बिग बॉस 11 मध्ये स्पर्धक होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खेसारी लालचं नवीन गाणं रिलीझ, पंजाबी गायकांनाही देतोय टक्कर; चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद
-सुपरस्टार अरविंद आणि काजल पहिल्यांदाच दिसले रोमान्स करताना, व्हिडिओ पाहून प्रेक्षक भलतेच खुश