Friday, March 29, 2024

‘भेडिया’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री क्रिती सेननने धक्का दिल्यानंतर पाण्यात पडता पडता वाचला वरुण धवन, व्हिडिओ जोरदार व्हायरल

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आजकाल त्याची सहअभिनेत्री क्रिती सेनन हिच्यासोबत ‘भेडिया’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ते सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये शूटिंग करत आहेत. वरुण आणि क्रिती नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांना अपडेट देत असतात. यामध्ये भेडिया या चित्रपताच्या सेटवरील आणखी एक बीटीएस व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघे एका जंगलात शूटिंग करताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, क्रिती मस्तीच्या मूडमध्ये वरुण धवनला पाण्यात ढकलत असते. पण तो पडण्याआधी ती त्याला पकडते. पण वरुण घाबरतो, त्याला वाटते की तो खरचं पाण्यात पडतोय की काय? यावर हसत क्रिती तिथून बाजूला जाते. ती त्याला त्यावेळेस ढकलते, जेव्हा वरुणचे लक्ष नसते त्यामुळे तो खूप घाबरतो.

https://www.instagram.com/p/CNFmPGshWXD/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडिओमध्ये वरुण धवनने लाल रंगाचे जॅकेट, पांढरा टीशर्ट घातला आहे. तसेच क्रितीने जीन्स लाल जॅकेट घातले आहे.

हा व्हिडिओ मूव्ही क्रू सोबत संपतो. ज्याची शूटिंग तिथेच काही अंतरावर चालू असते. या चित्रपटात वरुण पहिल्यांदाच एक वेअरवोल्फची भूमिका निभावतात दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट या वर्षी 14 एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे अशी घोषणा केली होती. या सोबतच त्यांनी भेडिया या चित्रपटाचा टिझर देखील रिलीझ केला होता. त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खेसारी लालचं नवीन गाणं रिलीझ, पंजाबी गायकांनाही देतोय टक्कर; चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद

-सुपरस्टार अरविंद आणि काजल पहिल्यांदाच दिसले रोमान्स करताना, व्हिडिओ पाहून प्रेक्षक भलतेच खुश

-मेगा स्टार चिरंजीवी आणि राम चरणच्या ‘आचार्य’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीझ, अभिनेत्याच्या डान्स मुव्हजची होतेय प्रशंसा

हे देखील वाचा