Saturday, February 22, 2025
Home बॉलीवूड भारतीय क्रिकेटर रिषभ पंतसोबत जोडलं गेलं अभिनेत्री उर्वशी रौतेलाचं नाव, म्हणाली, ‘मी कोणत्याही क्रिकेटपटूला…’

भारतीय क्रिकेटर रिषभ पंतसोबत जोडलं गेलं अभिनेत्री उर्वशी रौतेलाचं नाव, म्हणाली, ‘मी कोणत्याही क्रिकेटपटूला…’

बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते फार जुने आहे. अनेक अभिनेत्रींशी क्रिकेटपटूंचे नाव जोडले गेले आहे. अशातच आता भारतीय संघाचा क्रिकेटपटू आणि बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्या नात्याविषयीच्या चर्चांना मागील काही काळापासून उधाण आलं होतं. या दोघांनीही याबाबत जाहीरपणे काहीही बोलणे टाळले होते. मात्र, २०१९ मध्ये या दोघांना एकत्र पाहिल्या गेले होते. त्यानंतर दोघांचे अफेअर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आले होते. इतकेच नव्हे तर रिषभ पंतने उर्वशीला व्हॉट्सऍपवर ब्लॉक केल्याचीही माहिती होती.

आता या चर्चेवर उर्वशीने उत्तर दिले आहे. त्याचे झाले असे की, सध्याच्या सोशल मीडियावरील ट्रेंडनुसार उर्वशीने देखील एक प्रश्नोत्तराचे सत्र आपल्या अकाऊंटवर ठेवले होते. यात चाहत्यांनी तिच्या खाजगी आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यांबद्दल प्रश्न विचारले.

यात एका चाहत्याने तिला ‘तुमचा आवडता क्रिकेटपटू कोण’, असा प्रश्न विचारला. मात्र याचे सरळ उत्तर देणे तिने टाळले. याऐवजी तिने ‘मी क्रिकेट पाहत नाही. तसेच कुठल्याही क्रिकेटपटूला मी ओळखत देखील नाही. मात्र सचिन सर (सचिन तेंडुलकर) आणि विराट सर (विराट कोहली) यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे”, असे उत्तर दिले.

त्यामुळे आता पंत विषयी आडून विचारलेल्या प्रश्नाला उर्वशीने बगल दिली आहे, असेच म्हणावे लागेल. तसेच दोन वर्षांपूर्वीच्या चर्चा काहीही असल्या तरीही आता दोघेही आपल्याला व्यावसायिक आयुष्यात पुढे जात असल्याचेही दिसते आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-म्हणून सपनाला देसी क्वीन म्हणतात! अवघ्या काही दिवसांत सपनाच्या ‘या’ गाण्याला मिळालेत २ कोटी व्ह्यूज

-‘भेडिया’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री क्रिती सेननने धक्का दिल्यानंतर पाण्यात पडता पडता वाचला वरुण धवन, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-मेगा स्टार चिरंजीवी आणि राम चरणच्या ‘आचार्य’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीझ, अभिनेत्याच्या डान्स मुव्हजची होतेय प्रशंसा

हे देखील वाचा