एखादा कलाकार जेव्हा इंडस्ट्रीत येतो, तेव्हा त्याला लागोपाठ सिनेमे, वेबसीरिज, किंवा टीव्ही मालिकेत काम करायला मिळावे असे वाटते. मात्र, काहींबाबत तसे घडतेही, पण काहींना एखाद दोन सीरिजमध्ये झळकल्यानंतरही काम मिळणे कठीण होऊन बसते. असेच काहीसे आता प्रसिद्ध अभिनेत्री आंचल सिंग हिच्यासोबत घडत आहे. आंचलने ‘ये काली काली आंखें’ आणि ‘अनदेखी’ यांसारख्या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. मात्र, आंचल काम मिळत नसल्यामुळे चिंतेत आहे.
अभिनेत्री आंचल सिंग (Actress Anchal Singh) हिला इंडस्ट्रीत येऊन आता 12 वर्षे झाली आहेत, पण तरीही तिला काम मिळत नाहीये. नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याचा खुलासा केला. या पोस्टमध्ये आंचल 6 महिन्यांपासून बेरोजगार (Anchal Singh Unemployed Since 6 Months) आहे. अभिनेत्रीने लांबलचक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मागील 6 महिन्यांपासून बेरोजगार
अभिनेत्रीने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, “प्रत्येकजण मला विचारत आहे की, मी पुढे काय करणार आहे. मला कोणते काम मिळाले आहे का. मी त्या सर्वांना खरं खरं सांगू इच्छिते की, मला 2 व्यतिरिक्त मागील 6 महिन्यांपासून कोणत्याही सीरिजमध्ये कोणत्याही रोलच्या ऑडिशनसाठी बोलावले नाहीये. जेव्हा मी फोन केला, तर लोकांनी म्हटले की, आता काहीच काम होत नाहीये आणि नॉमिनेशन माझ्या हातात नाहीये. सत्य हे कटू असते. मी कामाशिवाय घरी बसले आहे. हे वर्षाचा शेवटचा काळ आहे. मी माझ्या कुटुंबाकडे आले आहे आणि खऱ्या प्रेमाचा आनंद लुटत आहे.”
View this post on Instagram
आंचलने सांगितले सत्य
अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये पुढे असेही लिहिले की, ती धैर्य ठेवेल. कारण, तिला तब्बू आणि विद्या बालन यांच्यासारखे बनायचे आहे. याव्यतिरिक्त आंचलने माध्यमांशी बोलताना सांगितले की, सत्य कधीपासून एवढे साहसी झाले. ती म्हणाली, “मी लोकांना सत्य सांगत होती की, वेबसीरिजमध्ये प्रशंसा मिळण्याचा अर्थ असा नाहीये की, तुम्ही यशाच्या पायऱ्या चढू लागाल. याचा अर्थ आहे की, तुमच्याकडे ती क्षमता आहे, परंतु तुम्हाला वेळोवेळी सिद्ध करावे लागेल.”
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली की, “दु:खद बाब अशी की, काम न मिळाल्याने लोकांना लाज वाटते. काम न मिळाल्याने तुमचा प्रवास कमी महत्त्वाचा होत नाही. तसेच, तुम्हीही कुणापेक्षा कमी होत नाहीत. ही फक्त तुमची वर्तमानातील स्थितीतील आहे. मी खूप संघर्ष केल्यानंतरही काम केले आहे, परंतु काही जण आहेत, ज्यांना प्रतिभावान असूनही काम मिळत नाही. त्यामुळे एकमेकांशी जोडले राहणे आणि विश्वास ठेवणे गरजेचे आहे.”
View this post on Instagram
आंचल हिने ‘ये काली काली आंखे’ (Yeh Kaali Kaali Ankhein) या वेबसीरिजमध्ये काम केले होते. ही वेबसीरिज 2022च्या सुरुवातीला आली होती. यामध्ये तिच्याव्यतिरिक्त ताहिर राज भसीन, श्वेता त्रिपाठी, अरुणोदय सिंग, हेतल गडा, सौरभ शुक्ला आणि ब्रिजेंद्र काला यांसारख्या कलाकारांचाही समावेश होता. (web series yeh kaali kaali ankhein actress anchal singh fight fro work since last 6 months)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मृत्यूच्या 6 दिवसांनंतर तुनिषाचा कॅटरिनासोबतचा ‘तो’ फोटो व्हायरल, सर्वत्र रंगलीय एकच चर्चा
‘या’ कलाकारांच्या नात्याच्या गाडीचं चाक 2022मध्ये झालं पंक्चर, यादीत मराठी अभिनेत्रीचाही समावेश