Monday, June 17, 2024

मृत्यूच्या 6 दिवसांनंतर तुनिषाचा कॅटरिनासोबतचा ‘तो’ फोटो व्हायरल, सर्वत्र रंगलीय एकच चर्चा

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने मागील आठवड्यात गळफास घेत आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला होता. तिच्या आत्महत्या प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. तिच्या आत्महत्यामागे अभिनेत्रीचा सहकलाकार आणि एक्स बॉयफ्रेंड शीजान खान याला मुख्य आरोपी मानले जात आहे. अशात अभिनेत्री तुनिषाचा एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आत्महत्येनंतर फोटो व्हायरल
अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) ही अनेक टीव्ही शोमध्ये झळकली आहे. 20 वर्षीय अभिनेत्रीने कारकीर्दीच्या शिखरावर असताना आत्महत्या केली. अशात सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. अशातच अभिनेत्रीच्या निधनाच्या 6 दिवसांनंतर तिचा एक सेल्फी फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या फोटोत तुनिषा कॅटरिना कैफ (Katrina Kaif) हिच्यासोबत पोझ देताना दिसत आहे. दोन्हीही अभिनेत्री या फोटोत खूपच खुश असल्याचे दिसत आहे. तुनिषासाठी ही सेल्फी एका चाहतीप्रमाणे आहे.

कॅटरिनासोबत तुनिषाचा फॅन मोमेंट
हा फोटो सोशल मीडियावर इंस्टंट बॉलिवूड पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्या सांगण्यात आले आहे की, तुनिषा शर्माने 2016मध्ये ‘फितूर’ या बॉलिवूड सिनेमात कॅटरिना कैफची भूमिका साकारली होती. त्यामुळे अभिनेत्रीसोबत तुनिषाने बराच वेळ घालवला होता. हा फोटोही सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

चार महिन्यांच्या रिलेशनशिपमध्ये पूर्ण तुटली तुनिषा
खरं तर, 24 डिसेंबर, 2022 रोजी वसईत ‘अली बाबा: दास्तान-ए- काबुल’ या टीव्ही मालिकेच्या सेटवर तुनिषाने शीजान खान (Sheezan Khan) याच्या मेकअप रूममध्ये पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. ती दीर्घकाळापासून तणावात होती. असे म्हटले जात आहे की, चार महिन्यांच्या रिलेशनशिपमध्ये त्यांच्यात खटके उडायचे. त्यामुळे त्यांचे नाते जास्त काळ टिकले नाही. तिने ब्रेकअपनंतर पाचव्या दिवशीच प्रेमात धोका मिळाल्यामुळे हे मोठे पाऊल उचलले होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (actress tunisha sharma and katrina kaif throwback photo viral on social media after actress death)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ कलाकारांच्या नात्याच्या गाडीचं चाक 2022मध्ये झालं पंक्चर, यादीत मराठी अभिनेत्रीचाही समावेश

‘आईला जेव्हा वाटेल तेव्हा चापट मारु शकते’, असा का बाेलला सलमान खान? जाणून घ्याच

हे देखील वाचा