Monday, June 17, 2024

‘या’ कलाकारांच्या नात्याच्या गाडीचं चाक 2022मध्ये झालं पंक्चर, यादीत मराठी अभिनेत्रीचाही समावेश

2022 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले अस्ताना काही सेलिब्रिटी साताजन्माच्या गाठीत अडकले. तर काहींनी मात्र आपल्या नात्याचा घटस्फोटावर शेवट केला. तर अनेक सेलिब्रिटींचे ब्रेकअपही झाले. एकुणच मनोरंजसृष्टी ब्रेकअप्स आणि घटस्फोटामुळेही चर्चेत राहिली त्यात पहिली जोडी म्हणजे प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांनी यावर्षी घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. 2004 मध्ये धनुष आणि ऐश्वर्या यांचे लग्न झाले होते. लग्नाच्या जवळजवळ 18 वर्षांनी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान काही दिवसांपूर्वी असेही वृत्त समोर आले होते की त्यांनी हा निर्णय मागे घेण्याचे ठरवले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) पती प्रदीप खरेरा (Pradeep Kharera) यापासून घटस्फोट घेतला. मानसीने काही दिवसांपूर्वीच पतीपासून घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले होते. फक्त पैशांसाठी प्रदीपने लग्न केल्याचा आरोप मानसीने नाईकने केला. लग्नाच्या वर्षभरात मानसी आणि प्रदीप वेगळे झाले.

टायगर श्रॉफ (Tiger Shrof) आणि दिशा पाटनी (Disha Patani)हे दोघे दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. पण यावर्षी या कपलचा ब्रेकअप झाला. सध्या दिशा तिचा जिम ट्रेनर अलेक्झांडरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.

पत्नी मलायका अरोरा  (Malaika Arora) हिच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता अरबाज खान (Arbaj Khan) मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) हिला डेट करत होता. दोघे चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण अलीकडेच दोघे विभक्त झाल्याची बातमी समोर आली.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रूपाली भोसले (Rupali Bhosale) हिने याचवर्षी प्रियकर अंकित मगरे (Ankit Magare) याच्याशी ब्रेकअप केलं. या दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट करून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आईला जेव्हा वाटेल तेव्हा चापट मारु शकते’, असा का बाेलला सलमान खान? जाणून घ्याच
वर्षभरात चित्रपटांचा पाऊस पडला, पण ‘या’ सिनेमांवर बनवले गेले सर्वाधिक मीम्स; एक नजर टाकाच

हे देखील वाचा