बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या लग्नाच्या आधीच गरोदर होत्या. त्यांनी गरोदर असल्याची बातमी समजल्यानंतर लग्न केले होते. लग्नाला नऊ महिने पूर्ण होण्याआधीच त्यांच्या घरी पाळणा हलला. या गोष्टीमुळे अनेक वेळा त्या चर्चेचा विषय बनल्या होत्या. चला तर जाणून घेऊया या अभिनेत्रींबद्दल…
सेलिना जेटली
सन 2011 मध्ये सेलिना जेटलीने लग्न केले होते. परंतु लग्नानंतर काही दिवसातच तिने सोशल मीडियावर ती प्रेग्नेंट असल्याची बातमी दिली होती. लग्नाला 9 महिने पूर्ण होण्याआधीच त्यांच्या घरी पाळणा हलला होता.
नेहा धुपिया
नेहा धुपियाने सन 2018 मध्ये अभिनेता अंगद बेदी याच्यासोबत लग्न केले होते. लग्नाच्या महिन्यातच तिला मेहर नावाची मुलगी झाली. त्यामुळे ती लग्नाच्या आधीच गरोदर होती अशी चर्चा सर्वत्र पसरली होती.
नताशा स्टॅन्कोविक
मागच्या वर्षी क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांनी लग्न केले. लग्नाच्या 7 महिन्यांनंतर नताशाने मुलाला जन्म दिला. ती गरोदर असल्याची बातमी त्यांच्या लग्नाआधीच सर्वत्र पसरली होती.
अमृता अरोरा
अभिनेत्री मलायका अरोराची बहिण अमृता अरोरा हिने शकील लाद्दक या व्यावसायिकासोबत लग्न केले आहे. तिच्याबाबत या गोष्टी समोर आल्या होत्या की, तिने गरोदर असल्यानंतर लग्न केले.
दिया मिर्झा
दिया मिर्झाने मुंबईचा व्यावसायिक वैभव रेखीसोबत फेब्रुवारी महिन्यात लग्न केले होते. वैभव आणि दिया यांच्या लग्नानंतर दिया आई बनत असल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे. लग्नाच्या दीड महिन्यानंतर दियाने सोशल मीडियावर ती गरोदर असल्याची बातमी सांगितली.
ती लग्नाच्या आधीच गरोदर होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लतादीदींचा सल्ला न ऐकणे हरिहरन यांना पडले होते महागात, १०लाख लोकांसमोर ओढवला होता महाकठीण प्रसंग