बॉलिवूडमध्ये सध्या कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाच्या तुफान चर्चा रंगत आहे. मीडियामध्ये तर त्यांच्या लग्नासंदर्भात रोज नवनवीन बातम्या येत आहेत. या लग्नाबद्दल कियारा किंवा सिद्धार्थकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी अनेक जणं ‘जिथे आग तिथे धूर’ असे म्हणत ते लग्न करणारच म्हणूनच अशा बातम्या येत असल्याचे सांगत आहे. या लग्नाच्या बातम्यांवर आता कियारा अडवाणीचा नववधूचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कियाराच्या या ब्रायडल लूकवर आता नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात करत आहे.
View this post on Instagram
सध्या कियारा अडवाणीची मान्यवर मोहे ची जाहिरात सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या जाहिरातीमध्ये कियाराने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला असून, त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या लग्नाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर तिचा हा लूक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. कियारा आणि मान्यवरने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही जाहिरात शेअर केली आहे. यावर नेटकऱ्यांनी यावर कमेंट्स करत लिहिले की, “या जाहिरातीमध्ये सिद्धार्थ असता तर अजून बर झाले असते.” अजून एकाने लिहिले, “हा व्हिडिओ पाहून थोड्या वेळेसाठी का असेना असे वाटले की कियारा सिद्धार्थचे लग्न आहे.” दुसऱ्याने लिहिले, “लग्नही तयारी होत आहे का?”
कियारा आणि सिध्दार्थ यांच्या नात्याबद्दल मागील बऱ्याच वर्षांपासून बातम्या येत आहे. २०२१ मध्ये या दोघांनी ‘शेरशहा’ या सिनेमात एकत्र काम केले. त्यानंतर तर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाणच आले. अनेकदा त्यांना एकमेकांच्या घरी, एकत्र सुट्ट्या साजऱ्या करताना पाहिले जाते. तत्पूर्वी कियारा आणि सिध्दार्थ राजस्थानच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. लग्नाला जवळचे लोकच उपस्थित असणार असून, यात करण जौहर, कटरीना कैफ, सलमान खान, शाहरुख खान यांची नाव सामील आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे कसलं ते दुर्देव! अभिनेता ऋतिक रोशनने ज्या चित्रपटांची ऑफर धुडकावली तेच ठरलेत सुपरहीट
हॅपी बर्थडे कल्की! अनुराग कश्यपसोबत ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडच्या मुलीला दिला जन्म, वाचा अभिनेत्रीबद्दल