Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड शब्द अपुरे पडत आहेत! रितेश देशमुख आणि जिनेलियाच्या ‘वेड’ चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा केला पार

शब्द अपुरे पडत आहेत! रितेश देशमुख आणि जिनेलियाच्या ‘वेड’ चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा केला पार

दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुख यांच्या वेड चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावून ठेवलं आहे. मराठीच नाहीत तर बॉलिवूड कलाकारही या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. मराठी इंडस्ट्रीमधील सर्वाधिक कमाइ करणाऱ्या चित्रपाटांपैकी सैराट नंतर वेड चित्रपटाचं नाव घेतले जाते. बुधवार (दि, 18 जानेवारी) रोजी वेडने तब्बल 50 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल अभिनेत्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) याने नुकतंच त्याच्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे.ज्यामध्ये चित्रपटाचे काही फोटो आहेत. पहिल्या आठवड्यात वेड (Ved) चित्रपटाने 20.18 कोटींची कमाइ केली. तर दुसऱ्या आठवड्यामध्ये 20.67 कोटींची कमाई केली आहे. नुकतंच चित्रपटाने आता 50 कोटींचा देखिल टाप्पा पार केला आहे. त्याच्यासाठी रितेशने पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

रितेशने पोस्ट शेअर करत लिहिले की, “शब्द अपुरे पडत आहेत!!! वेड चित्रपटाला मोठ्या मनाने आपण स्वीकारले आणि भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार!” असं म्हणत रितेशने चहत्यांचे आभार मानले आहेत.

 

View this post on Instagram

 

रितेश देशमुखच्या वेड चित्रपटाने पहिल्याच आठवड्यामध्ये चांगली कामगिरी बजावली होती, यानंतर चित्रपटाच्या भरभराटीस सुरुवात झाली. पहिल्याच दिवसात चित्रपटाने सर्वाधिक कमाइ करणाऱ्या यादीत आपलं नाव नोंदवलं होतं. ‘लय भारी‘ चित्रपटाचा रेकॉर्ड देखिल वेड चित्रपटाने मोडित काढला आहे. आता हा चित्रपट मराठी इंडस्ट्रीमधील सर्वाधिक कमाइ करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकावर येऊन ठेपला आहे.

 

View this post on Instagram

 

रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) दिग्दर्शित वेड (Ved) चित्रपटाला आणि चित्रपटामधील गाण्यांना डोक्यावर घेतलं आहे. तब्बल 20 वर्षानंतर जिनेनिया देशमुख (Genelia Deshmukh) हिने अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले आहे. वेड चित्रपटामध्ये जिनेलिया सोबतच अभिनेत्री जिया शंकर (Jia Shankar) हिने देखिल मुख्य भूमिका निभावली आहे. तिची भूमिका देखिल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रितेश देमुख आणि जिनेल्याचं नातं बघून ‘वेड’ फेम जिया शंकर; म्हणाली, ‘तरुनांनी त्यांच्याकडून शिकायाला हवं…’
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला ऑगस्ट महिना ठरणार खास, फॅन्सला मिळणार मोठे गिफ्ट

हे देखील वाचा