Thursday, June 1, 2023

लय भारी! ‘पावनखिंड’मधील ‘या’ अभिनेत्याने बांधली लगीनगाठ, जोडप्याचे फोटो जोरदार व्हायरल

मराठी सिनेसृष्टीतून आनंदाची बातमी समोर येत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज झालेला ‘पावनखिंड‘ या सिनेमात ‘बहिर्जी नाईक’ ही भूमिका लीलया पार पाडणारा अभिनेता बोहल्यावर चढला आहे. हा अभिनेता इतर कुणी नसून हरीश दुधाडे आहे. हरीशने नवीन प्रवासाची सुरुवात केली असून तो आता लग्नाच्या बेडीत अडकला आहे. याची माहिती स्वत: हरीशने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.

सोशल मीडियावर फोटो शेअर करून दिली माहिती
अभिनेता हरीश दुधाडे (Harish Dudhade) याचा सोशल मीडियावर चांगलाच वावर असतो. तो नेहमीच त्याचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. अशात त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोतून त्याने लग्नाच्या बेडीत अडकल्याचे सांगितले आहे. हरीशने शेअर केलेल्या फोटोत तो पत्नीसोबत असून त्यांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. चाहतेही त्यांच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

हरीशचे भन्नाट कॅप्शन
हरीशने हे फोटो शेअर करत भन्नाट कॅप्शन दिले आहे. त्याने त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आणि नवीन प्रवास सुरू…” या कॅप्शनमध्ये त्याने हार्ट इमोजीचाही समावेश केला आहे. तसेच, #wedding #weddingday #happilymarried असे हॅशटॅग्जही लावले आहेत.

हरीशच्या पत्नीचे नाव समृद्धी निकम असून ती या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे, हरीशने या फोटोत सुंदर फेट्यात दिसत आहे. तसेच, त्याच्या पत्नीने गुलाबी आणि हिरव्या रंगाची साडीही परिधान केली आहे. त्यांच्या फोटोवर अभिनेत्री क्षिती जोग हिने कमेंट करत लिहिले आहे की, “मनापासून अभिनंदन पोरा.” एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “हार्दिक अभिनंदन, सर मनापासून शुभेच्छा!”

हरीशची कारकीर्द
हरीश दुधाडे याच्याबद्दल बोलायचं झालं, तर तो मागील 10-12 वर्षांपासून सिनेसृष्टीत काम करतोय. त्याने ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून अभिनयात पदार्पण केले होते. पुढे त्याने अनेक मालिकेत महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. यामध्ये ‘सरस्वती’, ‘नकळत सारे घडले’ आणि ‘तुमची मुलगी काय करते’ अशा मालिकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त तो सिनेमातही झळकला आहे. त्याने ‘पावनखिंड’, ‘फर्जंद’, ‘शिवप्रताप गरुडझेप’ आणि ‘फत्तेशिकस्त’ यांसारख्या ऐतिहासिक सिनेमात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘देवों के देव महादेव’ फेम पार्वतीने गुपचुप उरकला साखरपुडा, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल…
‘कांतारा 2’वर काम सुरू करण्यापूर्वी रिषभ शेट्टीने घेतले ‘या’ देवाचे दर्शन, परवानगीही मिळाली

हे देखील वाचा