मागील 12 वर्षांपासून दर्शकांचे मनोरंजन करणारी मालिका म्हणजे सब टीव्ही चॅनेलवरीलवरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा.’ या मालिकेमागील खरे यश म्हणजे या मालिकेतील पात्र. प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात त्यांचं स्वतंत्र असं एक स्थान निर्माण केले आहे. या मालिकेमध्ये मागील 12 वर्षात अनेक वेळा पोपटलाल याच्या लग्नाचा सिक्वेन्स दाखवला आहे. पण त्यांचं लग्न झालेलं कधीही दाखवले नाही. यावरून या मालिकेच्या कंटेंटवर नाराज होऊन एका युजरने मालिकेच्या दिग्दर्शकाला कमेंट केली आहे की, या मालिकेचा दर्जा घसरला आहे. या नाराज झालेल्या चाहत्याला दिग्दर्शक मालव राजद यांनी अगदी सौम्यपणे उत्तर दिले आहे.
तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेचे दिग्दर्शक मालव राजद हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ते नेहमीच त्यांच्या मालिके संबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांनी केलेल्या एका पोस्टवर एका युजरने अशी कमेंट केली आहे की, “तुमचे दिग्दर्शन खूपच बकवास आहे, आणि ही मालिका देखील खूप बकवास होऊ लागली आहे.” यावर मालव राजद यांनी कमेंट केली की, “ओके तुमचा हा पॉईंट नोट केला आहे.” यावर त्या युजरने पुन्हा कमेंट केली की, “खरंतर यात तुमची पूर्णपणे काही चूक नाहीये. तुम्ही तुमचे सगळे प्रयत्न करता, पण आजकाल या मालिकेचा दर्जा घसरत चालला आहे.”
काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील जेठालाल हे महत्त्वाचे पात्र निभावणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “जेव्हा तुम्ही क्वांटिटीचा विचार करता, तेव्हा क्वालिटीला कुठेतरी धक्का पोहोचतो. आधी आम्ही आठवड्यात फक्त एकदा ही मालिका दाखवायचो त्यामुळे दिग्दर्शकांना आठवडा मिळायचा पण आता आम्ही दररोज शूटिंग करतो. त्यामुळे वेळ नाही मिळत. शेवटी आम्ही पण माणूस आहोत ना. त्यामुळे क्वालिटीला धक्का बसतो.”
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका याहूच्या वार्षिक यादीत 2020 मध्ये सर्वात जास्त वेळा सर्च केलेली मालिका आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-फक्त २५० रुपये होता ‘दयाबेन’चा पहिला पगार; रक्कम मिळताच ठेवली होती ‘या’ व्यक्तीच्या हातावर
-यो यो हनी सिंगने केला आई- वडिलांचा वाढदिवस साजरा, फोटोला मिळाले ४ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स










