शाहरुख खान स्टरर पठाण चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांना चित्रपट पाहाण्याची उत्सुकता लागली आहे. एकीकडे पठाण चित्रपटाचा वाद आणि दुसरीकडे प्रेक्षकांकडून मिळणारा मोठा प्रतिसाद चित्रपटासाठी उत्सुकता दर्शवत अहेत. पठाण चित्रपटाच्या एडव्हान्स बुकिंसाठी देखिल प्रेक्षकांचा गदारोळ सुरु झाला आहे. प्रत्येक चाहत्याला हा चित्रपट फस्ट डे फस्ट शो बघण्याची उत्सुकता लागली आहे. अशातच शाहरुखच्या एका चताहत्याने टिकिचं एडव्हान्स बुकिंग मिळालं नाही म्हणून थेट अभिनेत्याकडेच धाव घेतली आहे.
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात मोलाचे स्थान निर्माण केले आहे. शाहरुखचा चाहतावर्ग त्याच्यासाठी काय करेल हे सांगणं खूपच कठीण आहे. नुकतंच शहरुखने ट्वीटरद्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यासाठी त्याने ‘आस्क एसआरके’ (Ask SRK) अशा प्रश्न-उत्तराचं सेशन ठेवलं होतं. या सेशनद्वारे चाहत्यांनी अभिनेत्याला अनेक प्रश्न विचारले आणि शाहरुखने त्यांचे उत्तरे देखिल दिली. त्यावेळी एका चाहत्याने चक्क शाहरुख खानलाच चित्रपटाच्या पहिल्या शोची तिकिटं मिळवण्यासाठी मदत मागितली.
तर एका चाहत्याने थेट शाहरुखला ट्वीट करत लिहिले की, बुक माय शोची साईट क्रॅश झाली आहे. तू मला दोन तिकीट मिळवून दे म्हणजे मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघू शकेन.” त्याच्या या मागणीवर शाहरुखनेही भन्नाट उत्तर दिलं. तो म्हणाला, “नाही. तिकिटं तर तुझी तुलाच मिळवावी लागतील. क्रॅश किंवा नो क्रॅश. शाहरुखचे हे भन्नट उत्तर ऐकूण चहत्यानी देखिल शाहरुखचं कौतुक केलं आहे.
Nahi tickets toh u will have to buy yourself…crash or no crash…. https://t.co/gUxVW5ZtAD
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 21, 2023
पठाण चित्रपट पाहाण्यासाठी अने प्रेक्षकांची उत्सुकता तर आपण पाहिलीच आहे मात्र, या चित्रपटाला अनेक कठीण परिस्थितीचा सामना देखिल काराव लागणार आहे असाही अंदाज दर्शवला जात आहे. पठाण चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं असून यामध्ये अॅक्शन थ्रिलरचा तडका पाहाया मिळणार आहे. येत्या (दि, 25 जानेवारी) रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘…हाच माझा धर्म’, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर प्रसाद ओक स्पष्टच बोलला