मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी मोजक्याच पण हिट चित्रपटांमध्ये काम करून वेगळी ओळख निर्माण केली. याच चित्रपटांमुळे आज त्या घराघरात पोहोचल्या आहेत. अशीच एक सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे ‘शालू’ अर्थातच राजेश्वरी खरात. राजेश्वरी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये आघाडीवर आहे. इंस्टाग्रामवर तिचे दीड लाखांपेक्षाही अधिक फॉलोवर्स आहेत. तसेच फेसबुकवर तिचे दोन लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. राजेश्वरीला ट्विटरवर फारसे फॉलोवर्स नसले तरीही ती त्या माध्यमावर सतत काहीतरी पोस्ट करत असते. कधी पारंपारिक ड्रेसमधील, तर कधी हॉट अंदाजातील फोटो शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. आज राजेश्वरी आपला २३ वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवशी तिने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
राजेश्वरीने सन २०१३ मध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले होते. या चित्रपटात तिने शांत, गोड अशा ‘शालू’ या शाळकरी मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिच्या वाटेला खूप जास्त संवाद आले नाहीत. पण चित्रपट खूप गाजला. यानंतर तिने प्रदिप टोंगे व मंगेश शेंडगे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आयटमगिरी’ चित्रपटातही मुख्य भूमिका निभावली होती. त्यानंतर राजेश्वरीचे अजूनतरी मोठ्या पडद्यावर दर्शन झालेले नाही.
राजेश्वरीने आपल्या वाढदिवशी स्वत: विषयीची एक भली मोठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने स्वत:ला आलेला चांगला- वाईट अनुभव या पोस्टमध्ये मांडला आहे. तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. चाहतेही तिच्या पोस्टला प्रतिसाद देताना दिसत आहेत.
राजेश्वरीने लिहिले की, “वय विचारू नका थोडी लाज वाटते, परंतु अनुभवाबद्दल सांगायच झालं तर बर्याच प्रमाणात वाईटही होता आणि खूप सार्या प्रमाणात चांगलाही होता. अनेक लोक भेटली कोणी आपले झाले कोणी काम झाल्यावर बाजूला झाले व कोणी अजूनही सोबत उभे आहेत. वेळ चांगली असो वाईट असो आपण सर्व माझ्यासोबत होता आणि आपण दिलेल्या प्रेमामुळे आज राजेश्वरी येथे पोहोचली आहे. वैयक्तिक आयुष्यात राजेश्वरी कोण आहे, कशी आहे याची कल्पना फार कमी लोकांना आहे. कधी नजर वर करून न चालणारी, आपल्या कामाशी काम ठेवणारी, कोणी काही बोललं तर ढसा ढसा रडणारी, चष्मा लावून दोन वेण्या बांधून सायकल वर शाळेला जाणारी खूप साधारण मुलगी होती राजेश्वरी.”
“आयुष्यात एक मोठा बदल लिहिलेला होता तो घडून आला आणि ती मराठी चित्रपटसृष्टीमध्ये झळकली. अभिनयाचा काहीच वारसा नसलेल्या त्या मुलीला सुरुवातीला माहिती नव्हते हे नवीन जग काय असतं. कोणी सांगितलं तसं करून पाहिले, कधी स्वतःच्या मनाने करून चुकाही घडल्या आणि असेच चुकत चुकत बराच अनुभव आला. लोकांची परख कशी करावी माहित नव्हते म्हणून आयुष्यात अनेक ठिकाणी चुका घडल्या, परंतु त्यातून जे काही शिकायला मिळाले ते पुढे फार उपयोगाचे ठरले. आज सरळ तोंडावर खरे बोलण्याच्या सवयीमुळे बर्याच कमी प्रमाणात लोकांना ती आवडते. अभिनेत्री म्हणल्यावर कोणी कधी कोणती अफवा पसरवेल याचा नेम नाही, परंतु हे सुद्धा सकारात्मकपणे सांभाळून आजसुद्धा राजेश्वरी आपल्या आयुष्यात खूप खुश आहे. इतर वेळी कधी बोलायला वेळ मिळत नाही, आज वाढदिवसानिमित्त थोडं बोलायला मिळाले.”
“असो, आपण सर्वांच्या प्रेमामुळे आज फार छान वाटल, काल रात्रीपासूनच फोन, मेसेज इतक्या प्रमाणात चालू झाले आहेत की काय सांगावे. परिस्थिती पाहता मी आज वाढदिवस साजरा करणार नाही, तरीही माझ्या आग्रहाने आपण सर्वांनी थोडे थोडे तोंड गोड करून घ्या आणि जसे जमेल तसे आपली व आपल्या जवळच्यांची काळजी घ्या, मास्क लावा विनाकारण बाहेर फिरू नका. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार आणि खूप खूप प्रेम,” असेही पुढे राजेश्वरीने लिहिले.
https://www.facebook.com/rajeshwarikharat007/posts/1661212027599566
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
-‘शालूच्या पिरतीचा विंचू फॅन्सला चावला’, पाहा जब्याच्या शालूचे बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो