सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात


आतापर्यंत मराठीत असंख्य चित्रपट बनले आहेत. या चित्रपटांत कलाकारांनी साकारलेल्या अफलातून भूमिकांमुळे चित्रपट हिट ठरले. यातील एक म्हणजे सन २०१३ साली आलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ चित्रपट. या चित्रपटातील कलाकार हे खूप प्रसिद्ध असे नव्हते. परंतु त्यांच्या भूमिकांमुळे त्यांनी चांगले नाव कमावले. या चित्रपटात राजेश्वरी खरात हिने साकारलेली ‘शालू’ ही भूमिका चांगलीच गाजली. यामध्ये तिची ओळख जब्याची शालू अशी होती. या चित्रपटात तिचे खूप संवाद नसले, तरी तिचा अभिनय मात्र अफलातून होता.

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रींप्रमाणे राजेश्वरी खरात हीदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. फेसबुकवर तिच्या पेजला ५० हजारांपेक्षा अधिक लाईक्स आहेत. ती आपले नवनवीन फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकतेच तिने आपले भन्नाट फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांना घायाळ करत आहेत.

तिने जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला असून या फोटोंमध्ये ती एकदम सुंदर दिसत आहे. हेअरस्टाईल आणि तिच्या कानातले तिच्या सौंदर्यामध्ये भर घालत आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

यापूर्वीही तिने फोटोशूट केले होते. त्याचेही फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते.

फँड्री या चित्रपटानंतर राजेश्वरीने २०१७ साली ‘आयटमगिरी’ चित्रपटातही काम केले होते. यानंतर मात्र ती इतर कोणत्याही सिनेमात झळकलेली दिसली नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो
-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज
-हिट झालेल्या सिनेमाचे श्रेयही राजीव कपूर यांना मिळाले नाही, वडिल राज कपूर यांनीही दिली नव्हती साथ
-‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनीपासून ते करीना कपूरपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी केलंय विवाहित पुरुषांशी लग्न; वाचा कोणाकोणाचा आहे समावेश
-शूटिंगदरम्यान राजीव कपूर पडले होते पद्मिनी कोल्हापुरेच्या प्रेमात; राज कपूर यांनी धमकी दिल्यावर तुटले होते दोघांचे नाते


Leave A Reply

Your email address will not be published.