मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या प्रसिद्ध मालिकेने प्रेक्षकांच्या मनात मोठं स्थान निर्माण केलं आहे. त्याशिवाय या मालिकेतील स्वीटू हे पात्र तुफान गाजलं आहे. यामधील मुख्य भूमिकेत काम करणारा अभिनेता ओम म्हणजेच शाल्व किंजवडेकर याने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांवर भुरळ घातली होती. अशताच अभिनेत्याला खऱ्या आयुष्यातही स्वीटू मिळाली आहे. म्हणजेच शाल्व लवकरच बोहल्यावर चढणार आहे.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका येऊ कशी तशी मी नांदायला (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) यामधील ओमची भूमिका साकारणारा अभिनेता शाल्व किंजवडेकर (Shalva Kinjawadekar) लकरच विवाह बंधनात अडकणार आहे. शाल्व त्याची ग्रर्लफ्रेंड श्रेया डाफळापूरकर (Shreya Daflapurkar) सोबत आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे. नुकतंच या जोडप्याच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून मेहंदी सोहळ्याचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये शाल्व आणि श्रेयानी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. या दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहेत. शाल्वने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे तर श्रेयाने पिवळ्या रंगाचा घागरा पिरिधान केलाय ज्यामध्ये श्रेयाचं सौंदर्य अजूनच फुललं आहे. यावेळी अभिनेता सिद्धार्थ चांदेर (Siddharth Chandekar) यानेही हजेरी लावली होती.

शाल्व आणि श्रेया हे अनेकवर्षापासून एकमेकांना डेट करत होते शेवटी त्यांनी त्यांच्या नात्याला लग्नबंधनात अडकवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे चाहतेही खूपच खुश आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंवर चाहतयांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
शिव ठाकरे नाही तर ‘या’ स्पर्धकाने पटकवली बिग बॉस 16 ची ट्रॉफी? सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
कट्टर वैरी असणारी शर्लिन चोपडाचे गुणगाण गातेय राखी सावंत; म्हणाली, ‘तिने मला खूप सपोर्ट…’










