Sunday, February 23, 2025
Home टेलिव्हिजन आभाळाएवढे यश संपादन करणाऱ्या बिग बॉस १६ च्या विजेता एमसी स्टॅनची संघर्षमयी कहाणी

आभाळाएवढे यश संपादन करणाऱ्या बिग बॉस १६ च्या विजेता एमसी स्टॅनची संघर्षमयी कहाणी

बिग बॉसचे यंदाचे १६ वे पर्व तुफान गाजले. शोला मिळणारी लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी या वर्षी शोला थोडी वाढीव मुदत देखील दिली. नुकतीच या शोची अंतिम फेरी पार पडली. या शोचे जेतेपद एमसी स्टॅनने पटकावत इतिहास रचला. शिव ठाकरे आणि प्रियंका चौधरी यावर्षी या शोचे विजेते असतील अशा चर्चा चालू असतानाच एमसी स्टेनने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत विजेत्याच्या ट्रॉफीवर वर नाव कोरले. या शोमध्ये येण्यापूर्वी एमसी स्टॅन कोण आहे हा कोण आहे याबद्दल जास्त कोणाला माहित नसेल. मात्र या शोने त्याला एक मोठी ओळख मिळवून देत अमाप लोकप्रियता मिळवून दिली. १ ऑक्टोबर रोजी सुरु झालेल्या या शोने तब्बल चार महिने लोकांचे भरभरून मनोरंजन केले. चला तर जाणून घेऊया एमसी स्टॅनबद्दल अधिक माहिती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Spotify India (@spotifyindia)

बिग बॉस १६चा विजेता ठरलेल्या एमसी स्टॅनचे खरे नाव आहे, अल्ताफ शेख. तो मूळचा पुण्याचा राहणार असून, लहानपणापासूनच त्याचे अभ्यासामध्ये लक्ष जरा कमीच होते. त्याचा जास्त कल गाण्याकडे होते. त्याने वयाच्या १२ व्या वर्षी कव्वाली गायला सुरुवात केली. त्याने प्रसिद्ध आणि लोकप्रिय रुपेरी रफ्तारसोबत देखील परफॉर्म केले आहे. एकवेळ अशी होती जेव्हा स्टॅनकडे आजिबात पैसे नव्हते. त्याने रस्त्यावर रात्री घालवल्या मात्र कधीच हिंमत गमावली नाही. तो त्याने त्याच्या मेहनतीने आणि अपार कष्टाने हे आभाळाएवढे यश कमावले. स्टॅनने नेहमीच त्याच्या गाण्यातून त्याचे आयुष्य उलगडले. आणि त्याच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. पुढे त्याचे ‘अस्तगफिरुल्लाह’ हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यातून त्याचा संघर्ष लोकांसमोर आला. एमसी स्टॅनने अनेक गाणी गायली मात्र त्याच्या ‘वाटा’ या गाण्याला अमाप लोकप्रियता मिळाली. या गाण्याला यूटुबवर २१ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. त्याला भारताचा Tupac म्हटले जाते.

आता तर एमसी स्टॅन हिप-हॉप इंडस्ट्रीमधील देखील एक लोकप्रिय चेहरा बनला आहे. हिप-हॉपमध्ये येण्याआधी तो बीट बॉक्सिंग आणि B-boying करायचा. एमसी स्टॅन केवळ २३ वर्षाचा आहे. एवढ्या कमी वयात त्याने भरपूर पैसा आणि प्रसिद्धी कामवाली आहे. एमसी स्टॅनने सांगितले होते की, एवढा पैसा त्याने केवळ ३/४ वर्षात कमावला आहे. त्याची एकूण नेट्वओर्थ ५० लाखांच्या आसपास असून, ती प्रत्येक महिन्याला त्याच्या गाण्यातून, यूटुबवरून आणि कॉन्सर्टमधून लाखो रुपये कमावत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट ‘या’ तारखेला हाेणार प्रदर्शित

राजकुमार हिरानी बनवणार लाला अमरनाथांचा बायाेपिक, ‘खिलाडी’ अक्षय दिसणार मुख्य भूमिकेत?

हे देखील वाचा