Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

हॉट अभिनेत्री सनी लिओनीने कोरोना काळातही मुंबईत खरेदी केले पाच BHK लक्झरी अपार्टमेंट, किंमत वाचून व्हाल हैराण

स्वतःचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. बॉलिवूडमधील अनेक कलाकार आज-काल स्वतःचे घर खरेदी करताना दिसत आहेत. जॅकलिन फर्नांडिस, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, जान्हवी कपूर या अभिनेत्रींनी त्यांचं स्वतःचं घर खरेदी केले आहे. यानंतर त्यांच्यापाठोपाठ हॉट अभिनेत्री सनी लिओनीनेही नंबर लावला आहे. तिने देखील मुंबईमध्ये ५ बीएचके अपार्टमेंट खरेदी केले आहे. तिच्या या घराची किंमत जाणून तुम्ही देखील हैराण व्हाल. हे घर खरेदी केल्यानंतर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की, या कोरोनाच्या काळातही तिने एवढं महाग घर खरेदी कसं केलं?

सनी लिओनीने अंधेरी वेस्टमध्ये अटलांटिस नावाच्या बिल्डिंगमध्ये बाराव्या मजल्यावर तिचे स्वतःचे घर खरेदी केले आहे. या ५ बीएचके अपार्टमेंटचा एरिया 3,976 स्क्वेअर फूट आहे. एवढ्या मोठ्या घराची सनी ही मालकीण झाली आहे.

मनी कंट्रोल डॉटकॉमच्या माहितीनुसार, सनीने 28 मार्च, 2021 रोजी तब्बल 16 कोटी रुपयांमध्येे हा फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट सनीने तिच्या खऱ्या नावावर म्हणजेच करणजीत कौर वोहरा या नावावर केला आहे. तिच्या या अपार्टमेंटमध्ये तीन पार्किंग स्लॉट आहेत.

तुम्ही विचार करत असाल की, कोरोनाच्या महामारीत देखील सनीने एवढा महाग फ्लॅट कसा काय खरेदी केला? कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र सरकारने स्टँप ड्युटीवर 3 टक्के सवलत दिली होती. 31 मार्च हा सवलतीचा शेवटचा दिवस होता. यामुळे या सवलतीचा लाभ घेण्यासाठी सनी लिओनीने 28 मार्चला या योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले. त्या सवलती व्यतिरिक्त सनीला स्टॅम्प ड्युटीसाठी 48 लाख रुपये मोजावे लागले.

सनी लिओनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या एम टीव्हीवरील स्प्लिटसविला या शोच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तसेच ‘विक्रम भट’ यांच्या ‘अनामिका’ या वेब सीरिजची शूटिंग देखील करत आहे. या वेबसीरिजमध्ये ती अभिनेत्री सोनाली सेहगलसोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लोकांची परख कशी करावी माहित नव्हते’ म्हणत राजेश्वरी खरातची वाढदिवशी भावनिक पोस्ट

-‘उफ्फ!’ नाकातल्या नथीने वाढवले हिना खानचे सौंदर्य, केला थेट चाहत्यांच्या काळजावर वार

-मोठी बातमी! ‘डान्स दीवाने ३’चा जज धर्मेश येलांडे कोरोनाच्या कचाट्यात, काही दिवसांपूर्वी १८ सदस्य झाले होते पॉझिटिव्ह

हे देखील वाचा