Saturday, March 21, 2026
Home बॉलीवूड चित्रपटाचे कौतुक करण्यासाठी ‘धाकड गर्ल’ कंगना रणौतला येतात चक्क ‘सिक्रेट’ कॉल, बॉलिवूडमधील ‘या’ सुपरस्टारचाही समावेश

चित्रपटाचे कौतुक करण्यासाठी ‘धाकड गर्ल’ कंगना रणौतला येतात चक्क ‘सिक्रेट’ कॉल, बॉलिवूडमधील ‘या’ सुपरस्टारचाही समावेश

बॉलीवूडमधील ‘धाकड गर्ल’ कंगना रणौत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच सर्वत्र चर्चेत असते. आपल्या स्पष्टवक्तेपणा या स्वभावामुळे तिला सर्वत्र ट्रोल केले जाते. प्रत्येक वेळी कंगनाने बॉलिवूडपासून ते अगदी भारताच्या राजकारणात अनेक वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत.

प्रत्येक प्रश्नात प्रत्येक अडचणीमध्ये तिने तिचे विचार देखील मांडले आहेत. आता पुन्हा एकदा कंगना तिच्या एका चित्रपटामुळे सर्वत्र चर्चेत आहे. तिने पुन्हा एकदा मूव्ही माफियांवर निशाणा साधला आहे. तिने असे म्हटले आहे की, बॉलिवूडमधील अनेक मोठे कलाकार मूव्ही माफियांना घाबरतात आणि कौतुक करण्यासाठी तिला सिक्रेट कॉल करतात. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या ट्विटमध्ये कंगनाने बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारच्या नावाचासुद्धा समावेश केला आहे. तिचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमधील स्क्रीन रायटर अनिरुद्ध गुहा यांनी एक पोस्ट पाहिली, त्यामध्ये असे लिहिले होते की, बॉलिवूडमध्ये आपला मत मांडणं हे आपल्यासाठी धोक्याचे ठरू शकते किंवा आपल्याला ही गोष्ट अडचणीत आणू शकते. हे ट्वीट पाहून अनिरुद्ध गुहा यांनी असे ट्वीट केले आहे की, “कंगना रणौत ही एका असाधारण पिढीमध्ये एकदाच जन्माला येणारी अभिनेत्री आहे.” कंगनाने‌ हे कौतुक वाचले आणि तिच्या आनंदाला सीमा राहिली नाही, आणि तिने पुन्हा ट्वीट करून उत्तर दिले आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1379829603422728192

अनिरुद्ध गुहा यांची पोस्ट बघून कंगना राणावतने ट्वीट केले आहे की, “बॉलिवूडमध्ये इतके शत्रुत्व पसरले आहे की, माझे कौतुक करताना अनेकांना अडचणीत टाकू शकते. मला अनेक सिक्रेट कॉल आणि मेसेज येतात. यामध्ये अक्षय कुमारसारख्या सुपरस्टारचा देखील समावेश आहे. त्याने चित्रपटाचे खूप कौतुक केले. परंतु आलिया आणि दीपिकाच्या चित्रपटांचे जेवढे कौतुक करतो, तेवढे खुलेआम कौतुक तो माझ्या चित्रपटाचे करू शकला नाही. ही मूव्ही माफियांची दहशत आहे.”

कंगनाचा ‘थलायवी’ चित्रपट येत्या २३ एप्रिल, २०२१ रोजी रिलीझ होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानच्या मुलीने केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर, म्हणाली ‘…तयार आहे’

-हॉट अभिनेत्री सनी लिओनीने कोरोना काळातही मुंबईत खरेदी केले पाच BHK लक्झरी अपार्टमेंट, किंमत वाचून व्हाल हैराण

-पहिल्या नजरेतील प्रेम! स्नेहाला पाहताच प्रेमात पडला होता अल्लू अर्जुन, घरच्यांनी नकार देऊनही ‘असा’ थाटला संसार

हे देखील वाचा