Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड हृदयाच्या समस्यांनी त्रासलेल्या दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्यावर झाली एंजियोप्लास्टी?

हृदयाच्या समस्यांनी त्रासलेल्या दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्यावर झाली एंजियोप्लास्टी?

बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक आणि निर्माते डेव्हिड धवन यांना ओळखत नाही, अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक तुफान हिट आणि गाजलेले सिनेमे दिले आहेत. खासकरून कॉमेडी सिनेमांमध्ये त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. सध्या जरी ते चित्रपटांपासून लांब असले तरी ते विविध कारणांनी मध्ये मध्ये मीडियामध्ये येत असतात. मधुमेहामुळे त्यांचे स्वास्थ मागील काही महिन्यांपासून ठीक नाही. यातच आता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे की, डेव्हिड यांची एंजियोप्लास्टी झाली आहे. 

प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार डेव्हिड धवन यांच्यावर एंजियोप्लास्टी करण्यात आली आहे. मुंबईमधील एका खासगी रुग्णालयात काही आठवड्यांपूर्वीच एंजियोप्लास्टी झाली असून, आता याबद्दल माहिती बाहेर आली आहे. मात्र यावर धवन कुटुंबातील कोणाचेच अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

एका मोठ्या मीडिया एजेंसीने दावा केला आहे की मुंबईमधील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये डेव्हिड धवन यांच्यावर एंजियोप्लास्टी करण्यात आली असून, त्यांच्या शरीरात स्टेंट देखील टाकण्यात आले आहे. सध्या डेव्हिड यांना डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती करण्याचे सांगितले आहे. डेव्हिड धवन यांची तब्येत मागील काही दिवसांपासून सतत ढासळत होती. यामुळे त्याचे कुटुंबीय चिंतेत होते. अशातच त्यांना हृदयाच्या तक्रारी देखील सुरु झाल्या, मात्र आता सर्व काही ठीक आहे.

दरम्यान डेव्हिड यांच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यात , ‘मुझसे शादी करोगी’, ‘कुली नंबर 1’ आदी हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

हृदयविकारामुळे मनोरंजन विश्वाने गमावले मोठे स्टार; यादी पाहून तुम्हीही व्हाल भावूक

‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीचे दुःखद निधन, घरात आढळली मृतावस्थेत

 

हे देखील वाचा