Thursday, June 26, 2025
Home बॉलीवूड ओ…हो…! करण जोहर त्याच्या आगामी सिनेमात शाहरुख खान नाही तर ‘या’ सुपरस्टार अभिनेत्यासोबत करणार काम?

ओ…हो…! करण जोहर त्याच्या आगामी सिनेमात शाहरुख खान नाही तर ‘या’ सुपरस्टार अभिनेत्यासोबत करणार काम?

करण जोहरच्या १९९८ साली आलेल्या ‘कुछ कुछ होता है’ सिनेमाने अमाप लोकप्रियता मिळवली आणि त्यात काम करणाऱ्या शाहरुख खान, काजोल, राणी आणि नक्कीच सलमान खान यांच्या करियरला एक सुखद वळण देखील दिले. या सिनेमात सलमान खानच्या भूमिकेसाठी कोणताही कलाकार तयार नसताना सलमान खानने करण जोहरला एका झटक्यात स्वतःहून या भूमिकेसाठी होकार दिला आणि सलमान या चित्रपटात दिसला. आता तब्बल २५ वर्षांनी ही जोडी एका चित्रपटाच्या निमित्ताने सोबत येणार असल्याचे सांगितले जात आहे.

मीडियामधील काही रिपोर्ट्सनुसार करणने एका चित्रपटासाठी सलमान खानशी चर्चा केली आहे. मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात या सिनेमावर करण आणि सलमानने दोनदा चर्चा केली. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. सांगण्यात येत आहे की, हा सिनेमा एका वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे. मात्र तेव्हा सलमानने त्याला ह्यूमन ड्रामा सिनेमा करण्यात रस नसल्यचे सांगत त्याला अजून काही चांगले प्रोजेक्ट असेल तर सांग असे म्हणाला होता.

मात्र माहितीनुसार करण दिग्दर्शक विष्णूवर्धनसोबत सलमानकडे एका सिनेमासाठी पोहचला होता. त्यावेळी त्या तिघांमध्ये सिनेमाबद्दल बरीच चर्चा झाली. अजून काही नक्की नसले तरी हे तिघं लवकरच एका सिनेमासाठी एकत्र येत असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी तर हे देखील सांगितले जात होते की, हा सिनेमा २०२४ साली ईदला प्रदर्शित केला जाईल. सलमान खानने होकार दिला तर सिनेमाच्या प्री प्रोडक्शनला आणि कास्टिंगसाठी काम सुरु होईल आणि नोव्हेंबरमध्ये सिनेमाचे शूटिंग सुरु केले जाईल.

दरम्यान सलमान खान सध्या त्याच्या ‘टायगर ३’मध्ये व्यस्त असून, सर्वांना या सिनेमाची जोरदार चर्चा असून, प्रतीक्षा देखील आहे. या सिनेमात सलमान खान कॅटरिना कैफ आणि इम्रान हाश्मी दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘TDM’ सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर, दिग्दर्शक म्हणाले, “अशा भेदभावामुळे माझी चित्रपट बनवण्याची… ”

‘नुकतेच मी माझे घर विकले’ आर्यन खानचा ब्रँड म्हणजे निव्वळ मस्करी, किंमती एकल तर हैराण व्हाल

हे देखील वाचा