Wednesday, August 19, 2026
Home बॉलीवूड “हे मी माझ्यासाठी केले” नवीन लूकमुळे ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री झाली ट्रोल, बघा तुम्हाला तरी येते का ओळखता?

“हे मी माझ्यासाठी केले” नवीन लूकमुळे ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री झाली ट्रोल, बघा तुम्हाला तरी येते का ओळखता?

बॉलिवूडमधील आणि खासकरून वेबसिरीज विश्वातील ओळखीचा चेहरा म्हणून अभिनेत्री कीर्ती कुल्हारीला ओळखले जाते. कीर्तीने तिच्या अभिनयाने अनेक बॉलिवूड चित्रपटांमधून आणि वेबसेरीजमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पडली आहे. कीर्ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि तर कधी व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येत असते. अशातच आता पुन्हा एकदा ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे कमालीची चर्चेत आली आहे. कीर्ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती सतत तिचे फोटो, व्हिडिओ अपलोड करत फॅन्सला तिच्याबद्दल माहिती देत असते. आता नुकताच तिने तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामुळे ती खूपच गाजत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kirti Kulhari (@iamkirtikulhari)

‘फोर मोर शॉट्स प्लीज’, ‘ह्यूमन’, ‘मिशन मंगल’, ‘पिंक’ आदी प्रोजेक्टमध्ये केलेल्या उत्तम अभिनयामुळे कीर्तीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. मात्र आता तिच्याबद्दल नाही तर तिच्या बदललेल्या हेयरस्टाइलबद्दल आणि लुकबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. कीर्तीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तिने तिचे केस कापल्याचे दिसत आहे. मात्र तिने नुसते केस कापले नाही तर ते एकदमच शॉर्ट केले आहे. तिच्या या स्टाईलमुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

कीर्तीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून, यात ती तिच्या शॉर्ट हेयरमध्ये दिसत आहे. ती तिच्या या स्टाईलमुळे कमालीची खुश असून तिने या व्हिडिओसोबत तिच्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. कीर्तीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “एका महिन्यापूर्वी मी निर्णय घेतला आणि आता करुनच टाकले. १५ वर्षे झाले मी सिनेसृष्टीमधे काम करत आहे. माझे करिअर सुरू होत, अनेकदा विचार केला की, कामातून वेळ मिळेल तेव्हा हे एकदा तरी नक्की करेल. मी खूप काही मोठे नाही केले. मी आता आयुष्य जगाताना असे निर्णय घेत राहणार असून, हे मी माझ्यासाठी केले आहे. कोणत्याही भूमिकेसाठी नाही.”

तिला तिच्या या नवीन हेयर स्टाइलमुळे अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले असून, काहींनी तिला पाठिंबा दिला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

बॉलिवूडपासून लांब आत्मिक शांतीसाठी आमिर खानने गाठले नेपाळ, विपश्यना केंद्रात करणार मेडिटेशन

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी गुपचूप उरकला साखरपुडा? डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना परी झाली स्पॉट

हे देखील वाचा