इम्रान हाश्मी आणि दिशा पटानी अभिनीत ‘आवारपन 2’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. आणि अवघ्या काही कालावधीत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. या चित्रपटाने वीकेंडला विक्रमी कमाई केली आणि त्यानंतर चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारच्या महत्तपुर्ण परीक्षेला सामोरा जात आहे. आत्याच्या आकडेवारीवरुन हे स्पष्टपणे दिसुन येते की, चित्रपटाच्या कमाईत घट झाली असली तरी त्याचे वर्चस्व कायम आहे.
‘पार्टिशन 1947’ हा चित्रपट पण याच दरम्यान रिलीज झाला तरी पण या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मागे टाकत
आवारपन 2 ने वर्चस्व गाजवले आहे. आवारापन चित्रपटाने या सोमवारी अंदाजे 9.6 कोटीची कमाई केली आणिदेशभरात अंदाजे 10,849 शोजमधुन हि कमाई केली होती. या ताज्या आकडेवारीसह, चित्रपटाची एकूण भारतीय निव्वळ कमाई 91 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. तर या चित्रपटाने रिलीजनंतरच्या पहिल्या तीन दिवसांत उत्तम कमाई केली आहे. तर चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत जगभरात 130.82 कोटींहून अधिक कमाई केली.
आवारापन 2 चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी 109.02 कोटींचा एकूण गल्ला जमवला आहे. तर निव्वळ गल्ला 91 कोटींच्या पुढे गेला आहे. भारतासह परदेशातही हा चित्रपट गाजतोय. तसेच इमरान (Emraan)हाश्मीला आतंरराष्टिय स्तरावर भरपुर प्रंशसा मिळत आहे. नितीन कक्कर हा चित्रपट दिग्दर्शित केला असुन या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून U/A 16+ प्रमाणपत्र मिळाले आहे.
हेही वाचा
‘हा आमचा इमरान हाश्मी नाही’, आवारापण 2 मध्ये किसिंग सीन नसल्याने चाहते नाराज










