Monday, October 5, 2026
Home › बॉलीवूड › ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, झोया अख्तर यांनी दिली खास अपडेट

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, झोया अख्तर यांनी दिली खास अपडेट

निर्माती-दिग्दर्शिका झोया अख्तरचा (Zoya  Akhtar) ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट आजही अनेकांचा आवडता आहे. लोकांना या चित्रपटाचा सिक्वेल पाहायचा आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत झोयाने चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल चर्चा केली.

झोयाने नुकतेच ‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’शी तिच्या कारकिर्दीबद्दल संवाद साधला. तिने ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या सिक्वेलवर चर्चा केली. ती म्हणाली, “आम्ही त्यावर काम करत आहोत.” पुढे ती म्हणाली, “काय होईल किंवा काय नाही हे आम्हाला माहीत नाही. आजच्या काळात या पात्रांशी पुन्हा जोडले जाणे योग्य वाटेल अशा टप्प्यावर आम्ही पोहोचू की नाही. पण तसे झाल्यास ती एक चांगली गोष्ट असेल.”

झोया अख्तर दिग्दर्शित ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मध्ये तीन मित्र स्पेनला जातात. या चित्रपटात स्पेनमधील सुंदर ठिकाणे दाखवण्यात आली आहेत. या प्रवासादरम्यान, हे तीन मित्र आयुष्याचे काही गहन धडे शिकतात आणि त्यांची मैत्री अधिक घट्ट होते. या चित्रपटात हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

“जिंदगी ना मिलेगी दोबारा” हा चित्रपट १५ जुलै, २०११ रोजी प्रदर्शित झाला. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, त्यावेळी चित्रपटाचे बजेट अंदाजे ५५ कोटी रुपये होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. SACNILC नुसार, चित्रपटाने जगभरात १५३.१० कोटी रुपये कमावले, तर भारतात १२१.४७ कोटी रुपये कमावले.

हेही वाचा

शाहरुख खानच्या ‘मन्नत’मध्ये नागपंचमीच्या दिवशी दिसले दोन साप; बचाव पथकाने एकाला पकडले, दुसऱ्याचा शोध सुरू

हे देखील वाचा