नाना पाटेकर मनोरंजनविश्वातील एक प्रतिभासंपन्न आणि अतिशय नम्र व्यक्तिमत्व. नाना पाटेकर यांच्या चित्रपटांपेक्षा अधिक त्यांच्या नम्र स्वभावाची आणि माणुसकी जपणाऱ्या वर्तवणुकीची जास्त चर्चा होत असते. याव्यक्तिरिक्त त्यांना निसर्गाची, स्वयंपाक करण्याची खूपच आवड आहे. ग्लॅमर जगात राहूनही अतिशय साधी राहणी आणि उच्च विचार सरणी असे नाना नेहमीच आपल्या वागण्या बोण्यातून समोरच्याचे मनं जिंकत असतात. अनोळखी आणि परक्या व्यक्तीला देखील ते भरभरून देतात. तर आपल्या लोकांसाठी ते किती करत असतील याचा आपण फक्त विचारच करूच शकतो. नानांमध्ये असे अनेक गुण आहेत, ज्याची नेहमीच या सिनेविश्वात चर्चा होते. यातलाच एक गुण म्हणजे मैत्री जपण्याचा. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि एक पोस्ट कमालीची व्हायरल होत आहे. या पोस्टमधून नाना किती चांगले मित्र आहेत, हे आपल्या लक्षात येईल.
अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्या आणि भारती आचरेकर यांनी नाना पाटेकर यांच्याबरोबर त्यांच्या फार्म हाऊसची सफर करत वेळ घालवला आणि आठवणींना उजाळा दिला. या संपूर्ण भेटीचा एक व्हिडिओ आणि त्याचसंदर्भात त्यांनी एक पोस्ट केली आहे.
View this post on Instagram
नीना यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “ये सालों की दोस्ती का मज़बूत जोड़ है..छूटेगा नहीं
१९७८ साली रंगमंचावर हमीदाबाईची कोठी हया नाटकाच्या निमित्ताने एकत्र आलो… विजया मेहतांच्या तालमीत तयार होता होता, हमिदाबाई ची कोठी, महासागर अश्या अविस्मरणीय नाटकांचे प्रयोग करता करता, सहकलाकारांचे मित्र झालो. सुखदुःखात साथ देत,भांडत ,हसत मस्तीत जगलो. होता होता आपआपल्या पाऊलवाटा शोधल्या. पण नाती सुटली नाहीत.. संबंध तुटले नाहीत.
आज ४५ हून अधिक वर्ष लोटली आहेत. तरीही स्नेह तसाच आहे, मैत्री वाढली आहे. मागील पानावरून पुढे! गप्पा, विनोद, चर्चा, प्रयोगातल्या आठवणींनी, दिवस रात्र अपुरे पडले! स्वतःच्या हातांने करुन वाढलेलं सुग्रास जेवण, नाना आणि त्याच्या परिवारा चं अगत्य, नानाच्या वाडीतली सुबत्ता… मन तृप्त झालं.”
नीना यांनी या पोस्टसोबत जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये त्यांनी फार्मचा फेरफटका मारला, झोक्याचा आनंद घेतला, कैऱ्या आदी अनेक गोष्टींचा मनमुराद आनंद त्यांनी लुटला आहे. सध्या नीना यांची ही पोस्ट खूपच व्हायरल झाली असून, त्यावर कलाकारांसोबतच सामान्य लोकं देखील कमेंट्स करताना दिसत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! लग्नाच्या आधी ज्युनियर एनटीआर ‘या’ कारणामुळे अडकला होता कायद्याच्या कचाट्यात
नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘ते’ सदाबहार डायलॉग, ज्यावर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव