Saturday, October 24, 2026
Home › बॉलीवूड › आणखी आराम हवा’, अमिताभ बच्चन यांनी दिलं आरोग्याबाबत मोठं अपडेट, नेमकं काय म्हणाले?

आणखी आराम हवा’, अमिताभ बच्चन यांनी दिलं आरोग्याबाबत मोठं अपडेट, नेमकं काय म्हणाले?

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच सोशल मीडीयावरुन ब्रेक घेतल्याची घोषना केली होती. ज्यामुळे त्यांचे चाहते थोडे निराश झाले आहेत. त्यांच्या चाहत्यांना नेहमीच त्यांच्या बाबतच्या सर्व अपडेट जाणुन घेण्यात रस असतो आणि आजकाल अमिताभ बच्चन सहसा सोशल मीडियावर खूप सक्रिय होते आणि आपल्या करिअरपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत सगळं ते सोशल मीडीया शेअर करायचे पण गेल्या काही दिवसांपासुन त्यंची प्रकृती ठीक नसल्याने डाॅक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. आणि बिग बींनी सोशल मीडीव्दारे आपल्या चाहत्यांना याबाबत अपडेट दिली होती, आणि आता मेगास्टारने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात त्यांनी म्हणले आहे की, त्यांना अजुन विश्रांतीची गरज आहे.

अमिताभ (amitaab)बच्चन यांनी सोशल मिडीयावर पोस्ट मध्ये म्हणले की, सध्या मला आरामाची गरज आहे. मी स्वता:ला  सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मानवी शरीर व त्याच्या वैशिष्ट्यांवर चिंतन करत आहे. यापूर्वी बुधवारी, त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्यांनी म्हटले होते की त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

बिग बी यांना एक्स वर लिहले, मी माफी मागतो. मला बरे होण्यासाठी विश्रांती घेण्याची गरज आहे, आणि असे डाॅक्टरांनी सक्त सांगितले आहे. त्यामुळे मी सध्या काहीही लिहिण्याच्या स्थितीत नाही.” तसेच  यापूर्वी, बिग बी यांनी आपल्या चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट शेअर केली होती.

हेही वाचा

पत्नीच्या कॅन्सरच्या काळात नाना पाटेकरांनी दिली साथ, शिवाजी साटम यांनी सांगितल्या भावुक आठवणी

हे देखील वाचा