Wednesday, March 11, 2026
Home बॉलीवूड माेठी बातमी! ‘विजय 69’च्या शूटिंगदरम्यान अनुपम खेर यांचा अपघात, अभिनेता गंभीररीत्या जखमी

माेठी बातमी! ‘विजय 69’च्या शूटिंगदरम्यान अनुपम खेर यांचा अपघात, अभिनेता गंभीररीत्या जखमी

अभिनेते अनुपम खेर हे बॉलिवूडमधील सर्वात टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक आहेत. चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारून त्यांनी आपली खास ओळख निर्माण केली. अशात अभिनेता त्यांच्या आगामी ‘विजय 69‘ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान सेटवर जखमी झाले. याची माहित खुद्द अभिनेत्याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फाेटाे पाेस्ट करुन दिली.

अनुपम खेर (anupam kher) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फाेटाेमध्ये अभिनेत्याने फाॅर्मल ड्रेस परिधान केला असून काळ्या रंगाचा स्लिंग घातला आहे. यासाेबत अभिनेत्याच्या हातात चेंडू देखील दिसत आहे. पाेस्ट शेअर करत अनुपम खेर यांनी सांगितले की, ‘त्याची आई दुलारी म्हणाली की, त्यांना कुणाची तरी नजर लागली आहे.’ यासाेबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्ही स्पोर्ट्स फिल्म करता आणि तुम्हाला दुखापत होत नाही! हे कसे होऊ शकते? काल ‘विजय 69’च्या शूटिंगदरम्यान खांद्याला गंभीर दुखापत झाली.”

अनुपम यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “दुखत आहे, पण जेव्हा स्लिंग खांद्यावर बांधणाऱ्या भावाने सांगितले की, त्याने शाहरुख खान आणि ऋतिक रोशनच्या खांद्यावरही स्लिंग बांधले होते, तेव्हा कळत नाही का, पण दुखणे थोडे कमी झाले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम यांनी पुढे सांगितले की, “पण तसे, मी जरा जोरात खोकललाे, तर माझ्या तोंडातून एक छोटीशी किंकाळी नक्कीच निघते! फोटोत हसण्याचा प्रयत्न खरा आहे! काही दिवसांनी शूटिंग सुरू हाेईल.”

या महिन्याच्या सुरुवातीला अनुपम यांनी त्यांच्या नवीन चित्रपट ‘विजय 69’ ची घोषणा केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय रॉय करत आहे.(Bollywood actor anupam kher injured during the shooting of vijay 69 he shared his pic on instagram )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नाट्यगृहातील अव्यवस्थेमुळे ‘हा’ दिग्गज अभिनेता भडकला, प्रेक्षकांची माफी मागत घेतला मोठा निर्णय

कॉलेजच्या दिवसांमध्ये ‘हा’ अभिनेता होता शेफाली शाहचा क्रश, अभिनेत्रीने प्रेमपत्रासह पाठवलेला फोटो 

हे देखील वाचा