बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिची डेब्यू वेब सीरिज ‘दहाड’मुळे चांगलीच चर्चेत आली आहे. यासोबतच अभिनेत्री 2 जूनला तिचा 36वा वाढदिवसही साजरा करत आहे. या खास दिवशी अभिनेत्रीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या मुलीसाठी एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. सोनाक्षी सिन्हा हिच्या वाढदिवासानिमित्त शत्रुघ्न सिन्हा यांनी अभिनेत्रीच्या सर्व कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की, मला माझ्या लेकीचा अभिमान आहे. यासोबतच शत्रुघ्न सिन्हा यांनीही अभिनेत्रीच्या वेब सीरिजचे कौतुकही केले. मात्र, त्यांनी दहाडला चित्रपट म्हटले.
शत्रुघ्न सिन्हा (shatrughan sinha) यांनी मुलीसाठी ट्विटरवर तीन पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “काय सुंदर काळ गेला आहे. या शुभ दिनी तुला खूप प्रेम. येणारे वर्ष आणखी आनंद, मनोरंजन आणि यशाने भरले जावो. आमच्याकडून तुला शुभेच्छा आहे.” आणि तु जे काही साध्य केले त्याचा अभिमान आहे.”
https://twitter.com/ShatruganSinha/status/1664454500529188864?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1664454500529188864%7Ctwgr%5Eaac9e823f78f9ab472c2996451c20a78c23ba054%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.jagran.com%2Fentertainment%2Fbollywood-sonakshi-sinha-birthday-shatrughan-sinha-wished-dahaad-actress-on-her-36th-birthday-23430383.html
ते पुढे म्हणाले की, “तुमचा दहाड चित्रपट शहरात चर्चेचा विषय आहे. आणि तुमच्या कार्याला आणखी एक पंख जोडणारा सर्वात अप्रतिम चित्रपटांपैकी एक, जाे नुकताच अमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे.”
https://twitter.com/ShatruganSinha/status/1664454509618163712?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1664454509618163712%7Ctwgr%5Eaac9e823f78f9ab472c2996451c20a78c23ba054%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.jagran.com%2Fentertainment%2Fbollywood-sonakshi-sinha-birthday-shatrughan-sinha-wished-dahaad-actress-on-her-36th-birthday-23430383.html
तिसऱ्या ट्विटमध्ये, अभिनेता म्हणाला, “तुम्ही आमच्यासाठी नेहमीच खूप खास असाल. तुमचा खास दिवस आणि प्रत्येक दिवस खूप आनंद, सुख आणि खूप प्रेम घेऊन येवो. ‘हॅपी ग्रेट डे!’ देव तुम्हाला आशीर्वाद देईल.”
View this post on Instagram
सोनाक्षी सिन्हा बऱ्याच दिवसांनी ‘दहाड’ सीरिजद्वारे सिनेसृष्टीत परत आली आहे. या वेब सीरिजद्वारे अभिनेत्रीने ओटीटीच्या दुनियेत पदार्पण केले आहे. दहाडमध्ये, अभिनेत्री एका इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहे, जे अचानक गायब झालेल्या मुलींचे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करते.(bollywood actress sonakshi sinha birthday shatrughan sinha wished dahaad actress on her 36th birthday)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘या’ चिमुकल्याच्या पत्नीसाेबत ऋतिकने केला ऑनस्क्रिन राेमान्स, ओळखा पाहू काेण?
पंजाबी गाण्यावर विकी काैशलने लावले ठुमके, व्हिडिओ एकदा पाहाच