Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

रिलीजपूर्वी आदिपुरुषच्या टीमची मोठी घोषणा,’या’ खास कारणास्तव प्रत्येक थिएटरमध्ये एक जागा ठेवणार रिकामी

बाॅलिवूड अभिनेत्री क्रिती सेनाॅन आणि प्रभास यांचा माइथोलॉजिकल ड्रामा ‘आदिपुरुष‘ रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट काही दिवसातच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, आता आदिपुरुषच्या टीमने एक मोठा निर्णय घेतला आहे, जो खूपच मनोरंजक आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला, जाणून घेऊया…

माध्यमातील वृत्तानुसार, आदिपुरुष (adipurush) रिलीज झाल्यानंतर प्रत्येक चित्रपटगृहात एक जागा रिक्त ठेवण्यात येणार आहे. या जागेचे तिकीटही विकले जाणार नाही आणि कुणालाही बसायला दिले जाणार नाही. माध्यमातील वृत्तानुसार, “टीमने एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये त्यांचे म्हणणे आहे की, “जिथे रामायणाचे पठण केले जाते, तेथे भगवान हनुमान दिसतात. हा आमचा विश्वास आहे. या श्रद्धेचा आदर करून, जेव्हाही प्रभासचा राम-स्टार आदिपुरुष प्रदर्शित होईल, तेव्हा विक्री न करता एक सीट खास हनुमानासाठी राखीव असेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

निवेदनात पुढे म्हटले आहे की, “रामाचा सर्वात महान भक्ताचा सन्मान करण्याचा इतिहास ऐका. हे महान कार्य आपल्याकडून अज्ञात मार्गाने सुरू झाले आहे. अशात आपल्या सर्वांना भगवान हनुमानच्या उपस्थितीत मोठ्या भव्यतेने आपली उपस्थिती दर्शवायची आहे.”

आदिपुरुषचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. त्याचबरोबर टी-सीरीजच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. आदिपुरुष 16 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आदिपुरुषमध्ये क्रिती सेनॉन आणि प्रभास यांच्यासह सैफ अली खान, सनी सिंग आणि देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत.(tollywood actor prabhas kriti sanon adipurush team big announcement of dedicating one seat to lord hanuman in every theatre report )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दर रविवारी बिग बी अनवाणी पायांनी चाहत्यांचे का करतात अभिवादन? स्वतःच सांगितले कारण

लग्नाशिवाय दुसऱ्यांदा आई हाेणार ‘ही’ अभिनेत्री, युजर्सेने ट्राेल केल्यावर रामपालच्या प्रेयसीने दिले चाेख उत्तर

हे देखील वाचा