Wednesday, October 9, 2024
Home बॉलीवूड ‘आदिपुरुष’च्या ट्रेलर लाँचमध्ये प्रभासने लग्नाबद्दल केला खुलासा; म्हणाला, ‘मी तिरुपतीमध्ये लग्न…’

‘आदिपुरुष’च्या ट्रेलर लाँचमध्ये प्रभासने लग्नाबद्दल केला खुलासा; म्हणाला, ‘मी तिरुपतीमध्ये लग्न…’

बॉलिवूड आणि साऊथ अभिनेता प्रभास सध्या त्याच्या आगामी ‘आदिपुरुष‘ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात प्रभाससोबत क्रिती सेनन, सैफ अली खान आणि सनी सिंग दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम तिरुपती येथे आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये प्रभास आणि क्रिती सेनन देखील सामील झाले होते. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून लोकांची उत्सुकता पूर्वीपेक्षा अधिकच वाढली आहे. यादरम्यान, अभिनेत्याने त्याच्या लग्नाबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे. काय म्हणाला अभिनेता? चला, जाणून घेऊया…

खरे तर, ट्रेलर लाँचच्या वेळी प्रभास (prabhas) आनंदी मूडमध्ये दिसला आणि चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाला, ‘मी तिरुपतीमध्ये लग्न करणार आहे’. हे ऐकल्यानंतर चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली. दरम्यान, प्रभासने चाहत्यांना वचन दिले की, ‘तो दरवर्षी 2 चित्रपट नक्कीच करेल आणि शक्य झाल्यास तो तिसरा चित्रपट देखील करेल. अशात तिथे उपस्थित असलेले चाहत्यांना हे ऐकूण खूप आनंद झाला.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

इतकेच नव्हे तर, कार्यक्रमापूर्वी प्रभास तिरुमला येथे दर्शन घेण्याासठी गेला होता. यावेळी अभिनेता पारंपारिक पोशाखात दिसला असून मंदिरात जाण्यासाठी त्यांनी पांढरी लुंगी आणि शर्ट परिधान केला होता. अशात अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांची तेथे माेठी गर्दी झाली होती.

‘आदिपुरुष’चे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. अशात हा चित्रपट 16 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून तेलगू, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे.( tollywood actor prabhas revealed about marriage in adipurush trailer launch )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलच्या लेकाने बदलले आपले नाव; आता प्रतीक बब्बर नाही तर ‘हे’ असणार नाव

लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’ असतो! ‘बाल शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आऊट, महाराष्ट्राचा ‘परश्या’ साकारणार बाल शिवाजी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा