‘गंदी बात‘ फेम अभिनेत्री गेहना वशिष्ठ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी गेहना चर्चेमध्ये येण्याचे कारण तिचा आगामी प्रोजेक्ट नसून तिचे वैयक्तिक आयुष्य आहे. खरे तर, गेहानाला तिच्या आयुष्याचा साेबती मिळाला असून ती लग्न बंधनात अडकली आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर येताच तुफान व्हायरल हाेत आहे. काय आहे नेकमे प्रकरण? चला जाणून घेऊया…
गेहाना वशिष्ठ (gehana vasisth) हिने तिचा प्रियकर फैजान अन्सारी (faizan ansari) याच्याशी लग्न केले आहे, ज्याच्यासोबत ती गेल्या काही दिवासांपासून रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, या जोडप्याने अद्याप त्यांचे नाते अधिकृत केले नाही, परंतु व्हायरल फोटो पाहून प्रत्येकजण त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, गेहानाने फैजानशी इस्लामिक रितीरिवाजांनुसार लग्न केले आहे.
गेहनाचा नवरा फैजान अन्सारीबद्दल सांगायचे झाले, तर तो सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि अॅक्टर आहे. फैजान अलीकडेच अॅमेझॉन मिनी टीव्हीचा रिअॅलिटी शो ‘डेटबाजी’मध्ये दिसला होता. अशात गेहनाबद्दल बाेलायचे झाले, तर ती अभिनेत्री-मॉडेल असून तिने तेलगू आणि हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप साेडली आहे.
गेहाना विशिष्ठला देखील शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राच्या केसमध्ये अटक करण्यात आली हाेती. माध्यमातील वृत्तानुसार, गेहनावर राज कुंद्राच्या अॅपसाठी अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप होता, ज्यासाठी तिला ताब्यात घेण्यात आले हाेते. मात्र, नंतर तिला जामीन मिळाला.
View this post on Instagram
गेहानाच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलयचे झाले, तर तिने ‘गंदी बात’ व्यतिरिक्त ‘उफ्फ’, ‘रिती रिवाज’, मेड फाॅर इच अदर यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (tv actress gehana vasisth out on bail in adult film making case married to social media influencer faizan ansari)
अधिक वाचा –
– धक्कादायक बातमी! फॅशन शो दरम्यान लोखंडी खांब अंगावर पडला, 24 वर्षीय मॉडेलचा जागीच मृत्यू
–‘महिलांबरोबर अन्नाचाही अपमान…’, प्रसिद्ध रॅपरने नग्न मॉडेल्सच्या अंगावर केले आश्चर्यकारक कृत्य, फाेटाे व्हायरल