अभिनेत्री सनी लिओनी 2012 मध्ये ‘बिग बॉस’च्या पाचव्या सीझनचा भाग बनली होती, ज्याला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. अशात आता तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा सनी या रिअॅलिटी शोचा भाग बनणार आहे. बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सनी दिसणार आहे. पण, यावेळी थोडा ट्विस्ट आहे. जिथे सनी ‘बिग बॉस 5’ मध्ये एक सहभागी म्हणून जोडली गेली होती, तर यावेळी सनी शोमध्ये पॅनेलिस्ट म्हणून दिसणार आहे.
सनी लिओनी (sunny leone) हिचे नाव ‘बिग बॉस ओटीटी 2’शी जोडले गेले आहे. सनी लिओनीने तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘बिग बॉस सीझन 5’ मधून केली होती. सलमान खानच्या या शोमधूनच तिला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला. ‘बिग बॉस’च्या सीझन 5मध्ये अभिनेत्रीचा अभिनय पाहून सगळेच थक्क झाले होते. अशा परिस्थितीत बॉलीवूडच्या एका मोठ्या दिग्दर्शकाचीही नजर तिच्यावर पडली आणि त्यानंतर सनीचे नशीब चमकले.
खरे तर, जेव्हा टीव्हीवर ‘बिग बॉस सीझन 5’चा शो सुरू होता, तेव्हा महेश भट्ट सनी लिओनला पाहण्यासाठी इतके उत्साहित झाले की, ते शोच्या मध्यभागी सनी लिओनीला स्वतःच पाहण्यासाठी गेले. घरात येताच त्याचे लक्ष फक्त सनीवर होते आणि त्यानंतर त्यानी सनीला त्यांच्या एका चित्रपटात काम करण्याची संधी दिली.
View this post on Instagram
अशात जेव्हा महेश भट्ट यांनी सनी लिओनला एक प्रोजेक्ट ऑफर केला, तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. महेश भट्ट यांनी तिला ‘जिस्म 2’ चित्रपटाची ऑफर दिली होती. सनीने ‘जिस्म 2’ चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट फारसा चालला नसला तरी सनीची बॉलिवूडमध्ये एंट्री या चित्रपटाने झाली. अशात आता सनी लिओनी बिग बॉसच्या सेटवर पुन्हा कमबॅक करत आहे.
या शाेमध्ये येण्याबाबत सनी म्हणाली, “मी घरी परतल्यासारखे आहे. या ठिकाणाशी माझ्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत. येथूनच माझ्या करिअरला टर्निंग पॉइंट आला. मी हा शो खूप जवळून फॉलो करत आहे, त्यामुळे मी पण आता नेक्स्ट लेवल नेण्यासाठी तयार आहे.” असे सनीने सांगतले. (bollywood actress sunny leone returns to salman show after 11 year with bigg boss ott 2 )
अधिक वाचा-
मुलाच्या मेहंदीत ‘नच पंजाबन’ गाण्यावर सनी देओलने केला भांगडा, व्हिडिओ एकदा पाहाच
खेसारी लाल यादवच्या ‘सन ऑफ बिहार’चा ट्रेलर रिलीज, चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार अभिनेता