बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. ‘कसौटी जिंदगी की‘ फेम अभिनेत्री श्वेता तिवारीने देखील खूप प्रसिद्धी मिळाली आहे. छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या श्वेता तिवारीने बॉलिवूडपासून भोजपुरीपर्यंतच्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप साेडली आहे.
अभिनयासोबतच श्वेता (shweta tiwari) सोशल मीडियावरही सतत सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर शेअर करत असते. श्वेताच्या फोटोंवर चाहते भन्नाट कमेंट करत असतात. श्वेता चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. दरम्यान सध्या श्वेताने एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. जाणून घेऊया ते कारण.
श्वेताने एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की‘ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केला. या शोमध्ये असलेला तिचा सहकलाकार सीझेन खान त्याच्या बायकोच्या कौटुंबिक हिंसाचार आणि खंडणीच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. त्याचवेळी श्वेता आणि सीझेनच्या डेटिंगच्याही अफवा पसरल्या होत्या. अशा परिस्थितीत यावर अभिनेत्री श्वेताने मौन तोडले आहे.
‘कसौटी जिंदगी की’ मध्ये काम करताना श्वेता आणि सीझेन खान यांनी एकमेकांना डेट करत होते. पण त्यांच नात फार काळ टिकू शकल नाही. त्यानंतर दोघांनी पण एका मुलाखतींमध्ये एकमेकांवर उघडपणे टीका केली आणि एकमेकांवर आरोपही केले. श्वेताने नुकतेच मौन तोडले आहे. ती म्हणाली की, “मला सीझेन खानसोबत खूप अडचणी येत होत्या. लोक त्याच्या आणि माझ्याबद्दल काहीही लिहितात. माझे सीझेनसोबत अफेअर होते? काय मुर्खपणा आहे. कोणी आम्हाला कुठे एकत्र पाहिले आहे का?”
पुढे श्वेता म्हणाली होती की ,”या आगोदर माझे अनेक लोकांशी संबंध होते. कधी मला कोणी कॉफी शॉप किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले आहे का? मला कोणी पार्टीत पाहिले आहे का? मी महिन्यातून 30 दिवस कसौटी जिंदगी की शूटिंग करते. माझ्याकडे अफेअरसाठी वेळ कुठे आहे? असे काही नाही. मी त्याचा द्वेष करते.” तिच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चास सुरू आहे. (Actress shweta tiwari once broke silence on dating rumors with kasautii zindagii kay co star cezanne khan said i hate him)
अधिक वाचा-
–आमिर खानसोबत पदार्पण करूनही नाही मिळालं यश, कपिल शर्माची ‘ऑनस्क्रीन’ पत्नी बनत सुमोनाने कमावलं नाव
–मानसी नाईकचा प्रसिद्ध रिल स्टारबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, चाहते म्हणाले, “नशिब काढलंस…”