Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

कियाराला उप्स मोमेंटपासून वाचवण्यासाठी कार्तिकने केले ‘हे’ कृत्य, व्हिडिओ एकदा पाहाच

सत्यप्रेम की कथा‘ 29 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे मुख्य कलाकार कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी आहेत. अशात दाेघेही या चित्रपटाच्या प्रमाेशनमध्ये व्यस्त आहेत. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला हाेता, ज्यानंतर चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्साही आहेत. अशात चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कियारा अडवाणी उप्स मोमेंटची शिकार होऊ शकली असती, पण तिला वाचवण्यासाठी ऐन क्षणी कार्तिकने एन्ट्री घेतली, ज्यामुळे चाहते अभिनेत्याच काैतुक करताना दिसत आहेत.

अभिनेता कार्तिक (kartik aaryan) आणि कियारा (kiara advani) हिचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कियाराने लाल रंगाचा ट्यूब ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये कियारा तिचा ड्रेस फिक्स करताना दिसत आहे आणि कार्तिक तिच्यासमोर ढाल बनून उभा आहे. कार्तिकचे हे काम चाहत्यांना खूप भावले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कियाराचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. अशात एका युजरने कमेंट करत लिहिले की,’खरा जेंटलमॅन’ त्याचवेळी एका युजरने लिहिले, हार्ट इमोजी देखील टाकाला आहे. बऱ्याच चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, कार्तिक हा सज्जन अभिनेता आहे. अभिनेत्याची ही शैली सर्वांच्या हृदयाला भिडली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

कियारा आणि कार्तिक पहिले ‘भूल भुलैया 2’मध्ये दिसले हाेते. या चित्रपटातली त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

‘सत्यप्रेम की कथा’चा ओपनिंग डे चांगला असण्याची अपेक्षा आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, हा चित्रपट पहिल्या दिवशी 6.5-7.5 कोटींचा व्यवसाय करू शकतो. बकरी ईदचाही या चित्रपटाला मोठा फायदा होणार आहे. कारण,३३ सणाला प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाचे कलेक्शन सुरुवातीला खूप चांगले असते. (bollywood actress kiara advani oops moment kartik aaryan became shield for her video viral)

अधिक वाचा-
राहुल शर्मासोबत घटस्फोटाच्या अफवांवर असिनने साेडले मौन, ‘गजनी’ अभिनेत्रीने पोस्ट करून सांगितले सत्य
केवळ अभिनेत्रीच नाही, तर ‘हे’ कलाकारही ठरले आहेत कास्टिंग काउचचे बळी, ‘या’ अभिनेत्यांनी मांडली उघडपणे व्यथा

हे देखील वाचा